सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 19:45 IST2022-03-29T19:45:16+5:302022-03-29T19:45:45+5:30
Nagpur News सीएची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ऋषभ पुंडलिक भांडेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे.

सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
नागपूर : सीएची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ऋषभ पुंडलिक भांडेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे.
चिटणीसनगरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारा ऋषभ सीएच्या अभ्यासक्रमाला होता. त्याचे आईवडील वेगवेगळे राहतात. आई संगीता (वय ४७) वर्धमाननगरात एक स्टोअर्स चालवित होती. ऋषभ फावल्या वेळेत त्यांना दुकान चालवायला मदत करायचा. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास ऋषभने सीलिंग फॅनला गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला डॉक्टरला दाखविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी ऋषभच्या घराची तपासणी केली. मात्र, सुसाईड नोट वगैरे काही मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी संगीता भांडेकर यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
- नैराश्यातून आत्महत्या?
ऋषभच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक चौकशीनुसार त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज नंदनवन पोलिसांनी बोलून दाखविला आहे.
----