आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:56+5:302021-04-18T04:08:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - आजाराला कंटाळून एका विवाहितेने फुटाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली. पूजा काैशिक सिरोया (२९) ...

Suicide of a married woman due to illness | आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - आजाराला कंटाळून एका विवाहितेने फुटाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली. पूजा काैशिक सिरोया (२९) असे मृत महिलेचे नाव असून ती मानेवाड्यातील रहिवासी होती. पूजाच्या पतीचा स्पेअर पार्ट तयार करण्याची कंपनी आहे. पूजाला विविध व्याधी जडल्या होत्या. उपचार करूनही लाभ होत नसल्याने पूजा कंटाळली होती. अखेर शुक्रवारी रात्री पूजा घरून बाहेर पडली. तिने फुटाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली. माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी तेथे जाऊन पूजाचा मृतदेह बाहेर काढला. काठावर पूजाची पर्स मिळाली. त्यात तिने सुसाइड नोट लिहून आत्महत्येचे कारण नमूद केले. तिच्या मोबाइलवरून पोलिसांनी तिच्या घरच्यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

तरुणीचा आकस्मिक मृत्यू

दिनांक १७ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पो. स्टेगिट्टी खदान हद्दीत चिंतामणनगर, भिवसनखोरी,

नागपूर - चितामणीनगर भीवसनखोरीत राहणारी भारती प्रदीप कहार (१९) या तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिचा शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास मृत्यू झाला.

---

तरुणाने लावला गळफास

नागपूर - लकडगंजच्या सुदर्शन चाैकाजवळ राहणाऱ्या कुंदन दीपक बैरीसाल (३२) यांनी शुक्रवारी रात्री ७. ३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

----

Web Title: Suicide of a married woman due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.