नागपूरचे सुधाकर देशमुख यांना राज्यमंत्री दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:06 IST2017-12-06T23:02:16+5:302017-12-06T23:06:09+5:30

पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला. ते विधानसभेतील पक्षाचे प्रतोद आहेत.

Sudhakar Deshmukh of Nagpur has given Minister of State status | नागपूरचे सुधाकर देशमुख यांना राज्यमंत्री दर्जा

नागपूरचे सुधाकर देशमुख यांना राज्यमंत्री दर्जा

ठळक मुद्देपश्चिम नागपूरचे भाजपचे आमदारविधानसभेतील पक्षाचे प्रतोद

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला. ते विधानसभेतील पक्षाचे प्रतोद आहेत. या नात्याने त्यांना हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. बुधवारी शिवसेना-भाजपाच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. फडणवीस हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना देशमुख यांनी त्यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे. सध्या ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

Web Title: Sudhakar Deshmukh of Nagpur has given Minister of State status