बापरे एवढे भयानक क्रौर्य ! रॉडने मारून मुक्या जीवाची हत्या; बचावासाठी आलेल्या महिला, मुलांना शिवीगाळ, धमक

By नरेश डोंगरे | Updated: April 8, 2024 23:36 IST2024-04-08T23:36:13+5:302024-04-08T23:36:54+5:30

गिट्टीखदानमधील घटनेने सर्वत्र संताप

Such terrible cruelty! Killing a dumb soul by beating it with a rod; | बापरे एवढे भयानक क्रौर्य ! रॉडने मारून मुक्या जीवाची हत्या; बचावासाठी आलेल्या महिला, मुलांना शिवीगाळ, धमक

बापरे एवढे भयानक क्रौर्य ! रॉडने मारून मुक्या जीवाची हत्या; बचावासाठी आलेल्या महिला, मुलांना शिवीगाळ, धमक

नरेश डोंगरे                                                                                                                                                     
नागपूर : गिट्टीखदानमधील एका गुंडाने सहा ते सात महिन्यांच्या श्वानाची निर्घृण हत्या केली. त्याला हटकण्यासाठी पुढे आलेल्या महिला आणि मुलांनाही अश्लील शिवीगाळ केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

अजय सांगोले असे या गुंडाचे नाव आहे. तो गोरेवाड्यातील सूर्या बारजवळ राहतो. तो नेहमीच दारूच्या नशेत परिसरात गुंडागिरी करतो. कुणी मिळाले नाही तर श्वान, मोकाट जनावरांना सूड घेतल्याप्रमाणे मारतो. रविवारी रात्री असेच झाले. बारजवळच्या परिसरात राहणाऱ्या मोकाट श्वानांपैकी एका श्वानाजवळ तो लोखंडी रॉड घेऊन आला आणि श्वानाला अमानुषपणे मारू लागला.

श्वान इकडे तिकडे पळत असताना त्या नराधमाने पाठलाग करून श्वानाला लोखंडी रॉडने ठार मारले. त्याचे क्राैर्य पाहून अनेकजण त्याला श्वानाला सोडून देण्याची विनंती करू लागले. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. एका महिलेसह काही मुलांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता सांगोलेने त्यांनाही शिवीगाळ करून धमकी दिल्याचे समजते. त्याने त्या श्वानाला फरफटत नेऊन बाजूच्या परिसरात फेकले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी दिलेल्या माहितीवरून सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या स्मिता मिरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी या क्रूर पशू हत्येची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊन कारवाईची मागणी केली आहे.

यापूर्वीही अनेक श्वानांना मारले

आरोपीने यापूर्वीही अनेक श्वानांचा जीव घेतला असून, जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्व श्वानांना उचलून घेऊन जा, अन्यथा यांनाही मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

Web Title: Such terrible cruelty! Killing a dumb soul by beating it with a rod;