शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सुब्रमण्यम् स्वामी म्हणतात, दाऊदच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे काँग्रेस नेते दबावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:06 IST

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपाच मिनिटात रद्द होऊ शकते कलम ३७०लोकतंत्र सेनानी मंचतर्फे नागपुरात आणीबाणी स्मृती दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला लोकतंत्र सेनानी मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश सोनी व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी हेदेखील उपस्थित होते. भारतातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईला जातो व तेथून मग ‘स्विस बँक’खात्यात तो जमा होतो. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या पैशांची कामे दाऊदने केली व त्यांची यादीच त्याच्याकडे आहे. कॉंग्रेस नेत्यांची काश्मीरबाबतची अलीकडची वादग्रस्त वक्तव्ये त्याच दबावातून आली आहे, असे सुब्रमण्यम् स्वामी म्हणाले. काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहापोटी हा दर्जा देण्यात आला. मात्र संविधानात लिहिलेले आहे की हे तात्पुरते कलम आहे व याला रद्द करण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकताच नाही. केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीने अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. अवघ्या पाच मिनिटांत हे कलम हटू शकत असताना इतके वर्ष का प्रतीक्षा करण्यात आली व सध्याचे सरकारदेखील पाच वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला. दीप्ती कुशवाह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर रवींद्र कासखेडीकर यांनी आभार मानले.राममंदिरासाठी अध्यादेश येऊ शकतोराममंदिराचा मुद्दा न्यायालयात असला तरी केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. एक अध्यादेश जारी करण्यात येईल व निवडणुकांच्या अगोदर राममंदिराचा मार्ग मोकळा करण्यात येईल, असा सुब्रमण्यम् स्वामी यांनी दावा केला. जर वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले तर जागा मंदिरासाठी देण्यात येईल, असे डॉ.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान असताना सरकारने शपथपत्रात म्हटले होते. तसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला यात फारशी अडचण जाणार नाही, असेदेखील ते म्हणाले.नेहरूंमुळे आंबेडकर, पटेलांवर अन्यायडॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांंची संविधान व देशनिर्मितीत मौलिक भूमिका होती. मात्र नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळात या तिघांनाही भारतरत्न मिळू दिले नाही. पहिले भारतरत्न नेहरू यांनाच मिळाले व त्यावर सहीदेखील स्वत: नेहरू यांचीच होती, असे सुब्रमण्यम् स्वामी यांनी सांगितले.देशात थेट आणीबाणी लागणार नाहीइंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर पुढील सरकारने संविधानात संशोधन केले. यानुसार थेट आणीबाणी लावणे शक्य नाही. केवळ देशात सशस्त्र विद्रोह झाला तर आणीबाणी लागू शकते. लोकशाही देशाच्या रक्तातच आहे. त्यामुळे जुनी आणीबाणी लागूच शकत नाही. आणीबाणीच्या अफवा खूप उठतात.मात्र देशातील भ्रष्टाचार हे त्याहून मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन स्वामी यांनी केले.विकासाने निवडणुका जिंकल्या जात नाहीदेशात आर्थिक विकासातूनच निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत तर लोकांच्या भावना हादेखील एक मोठा मुद्दा असतो. त्यामुळे पुढील निवडणुकांत भ्रष्टाचार, हिंदुत्व व विकास या त्रिसूत्रीच्या आधारावर भाजप लढेल असेदेखील स्वामी यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीnagpurनागपूर