शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तीन वर्षांत उपराजधानी आंतरराष्ट्रीय

By admin | Updated: August 1, 2016 01:52 IST

आघाडी शासनाच्या काळात नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदावरच होता.

नागपूर : आघाडी शासनाच्या काळात नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदावरच होता. नागपूरच्या विकासासंदर्भात अनेक प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेले होते. काँग्रेस सरकारच्या काळात नागपूरची सातत्याने उपेक्षा होत गेली, अशी घणाघाती टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खऱ्या अर्थाने हे शहर सरकारच्या अजेंड्यावर आणले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शहरात सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होताना दिसत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. एवढेच नव्हे तर विकासाची ही गाडी अशीच सुसाट धावणार असून येत्या तीन वर्षांत नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांच्या स्वत:च्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात २०० कोटी रुपयांच्या विवि विकास कामांचे भूमिपूजन केले. दिव्यांगाना उपयोगी नि:शुल्क कृत्रिम अवयव व साहित्य वितरण ही करण्यात आले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या प्रांगणात हा सोहळा झाला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिलेल्या सडेतोड उत्तराचीच चर्चा रंगली होती. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार व शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार मितेश भांगडिया, नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती दीपक म्हैसकर, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जि.प. सीईओ कादंबरी बलकवडे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जि.प. समाजकल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह द.प. नागपुरातील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ७०० दिव्यांगाना प्रमाणपत्रासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती फायबर आॅप्टिकने जोडून नागपूर जिल्हा डिजीटल केला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील २९००० ग्रा.प. डिजीटल होणार आहे. ३५० सेवा आॅनलाईन करण्यात येणार आहे. त्या मोबाईल अ‍ॅपवर आणून लोकांची कामे सहज होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, नागपूरच्या विकासासाठी भरपूर निधी मिळाला आहे. द.प. मधील ८००० लोकांना रस्त्याच्या आरक्षणातून मुक्त केले आहे. आता झोन स्तरावर सरकार आपल्या दारी शासनाने मतदार संघनिहाय जनता दरबार घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून सरकार आपल्या दारी हा उपक्रम महापालिकेच्या झोन स्तरावर होणार आहे. या उपक्रमाला ९ आॅगस्टपासून लक्ष्मीनगर झोनपासून सुरुवात होणार आहे. यात १६ वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करतांना अनेक अडचणी होत्या. परंतु सुलभपणे मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नवीन नियमाप्रमाणे मालकी हक्काचे पट्टे तात्काळ वाटप करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.