शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅप’मध्ये प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांत ‘कॅप’च्या दोनच फेऱ्या होत्या. त्यामुळे अनेकांना त्यानंतर ‘अगेन्स्ट कॅप’मध्ये प्रवेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांत ‘कॅप’च्या दोनच फेऱ्या होत्या. त्यामुळे अनेकांना त्यानंतर ‘अगेन्स्ट कॅप’मध्ये प्रवेश घ्यावा लागला. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, डोमीसाईल प्रमाणपत्र बनू शकले नाही व खुल्या प्रवर्गात प्रवेश घ्यावा लागला, त्यांनादेखील शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, असेदेखील आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती ‘विदर्भ अन-एडेड इंजिनिअरींग कॉलेजेस मॅनेजमेन्ट असोसिएशन’तर्फे देण्यात आली.

संघटनेच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी सामंत यांची भेट घेतली. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही. ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्ती थकीत आहे. त्यामुळे २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीतील थकीत शिष्यवृत्ती शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शुल्क निर्धारण समितीने अद्यापही शिक्षण शुल्काबाबत निर्णय घेतलेला नाही. ‘डीबीटी’वरदेखील शुल्क ‘अपलोड’ झाले नसल्याने शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणाचे अर्ज खोळंबले. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात यावे. तसेच सध्याची स्थिती लक्षात घेता शिक्षण शुल्कात १० टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली. प्रतिनिधीमंडळात अजय अग्रवाल ,अविनाश दोरसटवार, प्रमोद पापटवार, प्रशांत वासाडे, प्रशांत माहेश्वरी, सयाजी जाधव, अविनाश बदर, संजय वासाडे, अल्वी हेदेखील उपस्थित होते.