विद्यार्थ्यांनो नवे तंत्रज्ञान अवगत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:50 AM2017-07-22T02:50:37+5:302017-07-22T02:50:37+5:30

जनसंवाद अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. माध्यम क्षेत्राच्या कक्षा आता व्यापक झाल्या आहेत.

Students should know the new technology | विद्यार्थ्यांनो नवे तंत्रज्ञान अवगत करा

विद्यार्थ्यांनो नवे तंत्रज्ञान अवगत करा

Next

सुधीर गव्हाणे : धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये जनसंवाद सत्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनसंवाद अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. माध्यम क्षेत्राच्या कक्षा आता व्यापक झाल्या आहेत. जनसंवादाच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी जनसंवाद विभागप्रमुख तथा एम.आय.टी. पुण्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
धनवटे नॅशनल कॉलेज, पंजाबराव देशमुख इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्चच्या जनसंवाद विभागाच्या नवीन सत्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. बबन नाखले, नागेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंवाद व पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातून त्यांच्या कामाची गती व गुणवत्ता नक्कीच वाढेल. आता नवमाध्यमांचे जग आहे. सोशल मीडिया हे खूप मोठे आहे. यातही रोजगाराच्या अनेक संधी आहेत. प्रत्येकजण हा अद्वितीय असतो. प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात. आपल्या आत असलेल्या त्या विशेष गुणाचा शोध घ्यावा. त्याला विकसित करावे. त्याचाच व्यावसायिक उपयोग केला पाहिजे, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरेही दिली.
जनसंवाद विभागप्रमुख डॉ. बबन नाखले यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक जगात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. यावेळी प्रा. अशोक भड, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. आशिष उजवणे, संदेश सिंगलकर, अभिषेक आचार्य यांच्यासह जनसंवाद विद्याविभागाचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Students should know the new technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.