शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून समजावले कठीण विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:12 IST

‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो.

ठळक मुद्देनागपुरात राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे दिमाखदार आयोजन : राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. गणिताप्रमाणे विज्ञानही अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय. त्यातील अनेक गोष्टी डोक्यावरून जात असल्याने मुलांना कंटाळवाण्या वाटतात. रसायनशास्त्रातील ‘पीरियाडिक टेबल’ म्हणजे असाच नकोसा वाटणारा विषय. पण विद्यार्थ्यांनी या टेबलची मांडणी करणाऱ्या ‘मेंडेलियन काका की जय’ म्हणत सादर केलेल्या नाटकाने धम्माल उडविली आणि आपसूकच रासायनिक मूलद्रव्यांच्या पिरियाडिक टेबलकडे आकर्षित केले.राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालय, कोलकातांतर्गत नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या १४ व्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयावर अप्रतिम नाट्यकृती सादर केली. शुक्र्रवारी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे ही विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा दिमाखदारपणे पार पडली. मनोरंजनाच्या माध्यमातून विज्ञान विषय समाजापर्यंत पोहचविण्याच्या संस्थेच्या उद्देशाला विद्यार्थ्यांनी यशस्वी केले. महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक व कोकण अशा आठ विभागामधून विद्यार्थ्यांच्या आठ चमूने नाटक सादर केली. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते वसंत हंकारे व विभागीय उपायुक्त सुधाकर तेलंग यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. वर्ग ६ ते वर्ग १० च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती व प्रत्येक चमूमध्ये आठ विद्यार्थ्यांची मर्यादा होती. यावर्षी ‘समाज आणि विज्ञान’ या संकल्पनेवर ही संपूर्ण स्पर्धा आधारलेली होती. यामध्ये स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण, दळणवळण व गांधी आणि विज्ञान असे विषय देण्यात आले होते. युनेस्कोने २०१९ हे वर्ष ‘वर्ल्ड पिरियाडिक टेबल’ वर्ष म्हणून घोषित केल्याने या विषयाचाही समावेश स्पर्धेत होता.विज्ञान शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख प्रा. राजकुमार अवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम क्रमांकाच्या तीन नाटकांसह उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, लेखन व दिग्दर्शन असे चार पुरस्कार ठरविण्यात आले होते. यानुसार मुंबई विभागाच्या ‘गांधी आणि विज्ञान’ या नाटकाला प्रथम पुरस्कार, अमरावती विभागाच्या ‘सारणीचे आवर्तन’ या नाटकाला द्वितीय तर कोल्हापूरच्या टीमला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यापैकी पहिल्या दोन नाटकांची झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अमरावतीच्या नाटकाच्या लेखिका नम्रता प्रेमलवार यांना लेखनाचा तर मुंबई टीमसाठी अभिनेता, अभिनेत्री व दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूरचे संचालक रविकांत देशपांडे, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

टॅग्स :scienceविज्ञानNatakनाटकnagpurनागपूर