टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना
By जितेंद्र ढवळे | Updated: December 5, 2022 23:52 IST2022-12-05T23:51:22+5:302022-12-05T23:52:19+5:30
वेगात आलेल्या टाटा सुमाेने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली.

टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना
नागपूर (खात) : वेगात आलेल्या टाटा सुमाेने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार विद्यार्थिनीचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला तर तिचे आई व वडील गंभीर जखमी झाले. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील खात येथे साेमवारी (दि. ५) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
कांचन काशिनाथ आकरे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, लक्ष्मी आकरे व काशिनाथ आकरे, रा. ढाेलमारा, ता. माैदा अशी जखमी आई-वडिलांची नावे आहेत. कांचन ही विश्वमेघ कनिष्ठ महाविद्यालय, धर्मापुरी, ता. माैदा येथे इयत्ता अकरावीत शिकायची. ती कामानिमित्त आई व वडिलांसाेबत भंडारा येथे गेली हाेती. काम आटाेपल्यानंतर तिघेही एमएच-४०/बीडी-१२७३ क्रमांकाच्या माेटारसायकलने भंडाऱ्याहून ढाेलमारा येथे परत येत हाेते. वडील दुचाकी चालवीत हाेते तर कांचन व तिची आई मागे बसल्या हाेत्या.
ते खात परिसरात पाेहाेचताच मागून वेगात आलेल्या एमएच-१४/बीके-४१९५ क्रमांकाच्या टाटा सुमाेने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. माेटारसायकलसह तिघेही १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघात हाेताच स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना सूचना देत तिन्ही जखमींना भंडारा येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. मात्र, कांचनचा वाटेतच मृत्यू झाला. अपघात हाेताच चालक टाटा सुमाे साेडून पळून गेला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू हाेती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"