‘लेस्बियन’ मैत्रिणीच्या दबावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन मुलींवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 10:51 PM2023-04-12T22:51:54+5:302023-04-12T22:52:40+5:30

Nagpur News लेस्बियन पार्टनर आणि तिच्या मैत्रिणीच्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Student commits suicide due to pressure from 'lesbian' friend; A case has been registered against two girls | ‘लेस्बियन’ मैत्रिणीच्या दबावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन मुलींवर गुन्हा दाखल

‘लेस्बियन’ मैत्रिणीच्या दबावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन मुलींवर गुन्हा दाखल

googlenewsNext

नागपूर : लेस्बियन पार्टनर आणि तिच्या मैत्रिणीच्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर महिनाभरानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, सोनेगाव पोलिसांनी मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२३ वर्षीय अंकिता (नाव बदललेले) तांत्रिक प्रशिक्षण घेत होती. तिची संध्या (२४) (नाव बदललेले) हिच्याशी वर्षभरापासून मैत्री होती. संध्याच अंकिताला कॉलेजला घेऊन जायची. ६ मार्च रोजी होळीसाठी कॉलेज बंद असताना संध्याने अंकिताला कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्याचे सांगून तिच्या घरातून नेले. त्यादिवशी पुण्याहून अंकिताला लग्नासाठी स्थळ बघायला येणार होते. आईने फोन केल्यावर अंकिताने २ वाजता घरी येते, असे सांगितले. त्यानंतर ११.३० वाजता संध्याने फोन करून अंकिताने धंतोली पोलीस ठाण्याजवळील नाल्याजवळ विषप्राशन केले असून, तिला हिंगणा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. अंकिताचे कुटुंबीय तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी संध्याला धंतोलीऐवजी हिंगणा आतापर्यंत आणण्याबाबत विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. कॉलेजमध्ये कुटुंबीयांनी चौकशी केली असता घटनेच्या दिवशी अंकिता आणि संध्यामध्ये वाद झाला होता असे कळले. या वादानंतरच अंकिताने विषप्राशन केले होते. या घटनेची माहिती मिळताच अंकिताचा प्रियकर रुग्णालयात पोहोचला. त्याने दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच अंकितासोबत कोर्ट मॅरेज झाल्याचे सांगितले. नात्याबाबत कुटुंबात मतभेद असल्याने लग्नाची बाब लपविल्याची त्याने माहिती दिली. उपचारादरम्यान दि. ११ मार्च रोजी अंकिताचा मृत्यू झाला. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती

पोलिसांनी अंकिता आणि संध्या यांचे मोबाइल तपासले. यामध्ये संध्याने अंकितासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. अंकिताने तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याची माहिती संध्याला मिळाली. तिने अंकितावर लग्न आणि प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. स्वत:ला तृतीयपंथी असल्याचे सांगून संध्या अंकिताला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायची. तू आत्महत्या केलीस तर तुझ्या घरचे लोक सुखी होतील, असे सांगून ती अंकिताला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होती. संध्याची सरिता (नाव बदललेले) या २० वर्षीय विद्यार्थिनीशी मैत्री आहे. सरिताही अंकितावर दबाव आणायची. अंकिताची प्रकृती जाणून घेण्याच्या बहाण्याने तिही रुग्णालयात आली. अंकिताच्या कुटुंबीयांना ती म्हणायची की, अंकिता शुद्धीवर आली तर तिचे बयाण देण्याअगोदर माझ्याशी बोलणे करवून द्या, असे ती अंकिताच्या कुटुंबीयांना म्हणाली. अंकिताच्या नातेवाइकांनीही पोलिसांच्या चौकशीत अंकिता आणि संध्याच्या नात्याचे सत्य माहिती असल्याची कबुली दिली. त्याआधारे सोनेगाव पोलिसांनी अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संध्या आणि सरिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Student commits suicide due to pressure from 'lesbian' friend; A case has been registered against two girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.