शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

श्री गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:21 PM

११ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा बंदोबस्त १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आला असून, विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ९ पोलीस उपायुक्तांसह २,३०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे९ पोलीस उपायुक्तांसह २,३०० पोलीस नियुक्तबोट अन् वॉच टॉवरचीही व्यवस्थापोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री गणेश विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी तयारी केली आहे. ११ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा बंदोबस्त १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आला असून, विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ९ पोलीस उपायुक्तांसह २,३०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश विसर्जन बंदोबस्ताच्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर तसेच डॉ. शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत ११ ते १५ सप्टेंबरपर्यंत विसर्जनाचा बंदोबस्त राहणार आहे.विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात परिमंडळनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी घातपातविरोधी पथके नियमित तपासणी करणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कसलाही वादविवाद, गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व ठाणेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांना खबरदारीच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.मिरवणुकीदरम्यान कोणत्याही मार्गावर अडसर निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नियोजन करून १२ ही सेक्टरमध्ये वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॅण्ड-ढोलताशा पथकांमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, यासंबंधानेही काळजी घेण्यात आली आहे.विसर्जनाचे ठिकाणफुटाळा तलाव, कोराडी तलाव, वेणा नदी, महादेव घाट, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव अशा १० ठिकाणी अंदाजे ९८९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे; शिवाय घरगुती गणेशमूर्तींचेही विसर्जन केले जाणार आहे. कृत्रिम तलावाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तलावांवर बोट आणि वॉच टॉवरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.असा राहील पोलीस ताफापोलीस उपायुक्त : ०९सहायक आयुक्त : १४पोलीस निरीक्षक : ८७पीएसआय ते एपीआय : १६४पोलीस कर्मचारी : १६१४महिला कर्मचारी : ३७०होमगार्डस् : ३८७महिला होमगार्डस् : १०५बाहेरून बोलविलेले अधिकारी : २५एसआरपीएफ कंपनी : ०१सर्वाधिक बंदोबस्त फुटाळ्यावरश्री गणेशमूर्तींचे सर्वाधिक विसर्जन फुटाळा तलावावर केले जाते. त्यामुळे येथे एकूण बंदोबस्तापैकी २ उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, २३ पोलीस निरीक्षक, ४५ सहायक आणि उपनिरीक्षक, ३०० पोलीस कर्मचारी, ११५ महिला पोलीस, ५० पुरुष होमगार्ड आणि १६ महिला होमगार्ड तसेच एसआरपीएफची एक कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात चार राखीव पथके, क्यूआरटी, एसआरपी, आरसीपीचीही पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास ही पथके तातडीने तेथे पोहचतील.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस