शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 8:29 PM

वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देबेशिस्त ऑटो, बसचालकांविरुद्ध धडक कारवाईविस्कळीत वाहतूक वळणावर आणणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.गेल्या आठवड्यात भरणे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आज पत्रकारांसोबत शहरातील विस्कळीत वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांची समस्या मार्गी लावण्याच्या संबंधाने चर्चा केली.सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक आणि खासकरून ऑटोचालकांची गुंडगिरी टोकाला पोहचली आहे. ऑटोत बसविण्यासाठी ते ज्येष्ठ नागरिकांची अक्षरश: ओढाताण करतात. ऑटोत बसण्यास नकार दिल्यास टिंगलटवाळी करतात. रेल्वेस्थानक, बसस्थानक, कॉटन मार्केट आणि सीताबर्डी-धंतोलीत हा प्रकार सर्रास बघायला मिळतो. मध्यंतरी पोलिसांना मारण्याच्या आणि प्रवाशांना लुटण्याच्याही अनेक घटना घडल्या. कुठून, कसेही वाहन वळवून अन्य वाहनचालकांना, पायी चालणाऱ्यांना ऑटोचालक अडथळा निर्माण करतात, हे गैरप्रकार अनेक दिवसांपासून शहरात सुरू आहेत. त्याचा आपण अभ्यास केला असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी येत्या तीन ते चार दिवसात अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मुंजे चौकात मेट्रोच्या कामामुळे चार महिन्यांपासून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काम संपले तरी तेथे मोठ्या प्रमाणात कबाड पडले आहे. ते उचलून सीताबर्डी, धंतोलीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अ‍ॅफ्कॉन आणि एनसीसीची आपण मदत घेणार आहोत. २४ तास काम करून ते सर्व तेथून हटविले जाणार आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात हे सर्व पूर्ण करून वाहतूक सुरळीत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यासंबंधाने अ‍ॅफ्कॉनचे अधिकारी पै, विजय कुमार आणि वाहतूक शाखेचे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जमील अहमद यांच्याशी चर्चा करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी ५० मार्शल (मनुष्यबळ) मागून घेण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडारकर हजर होते.स्टार बस, ट्रॅव्हल्सचाही बंदोबस्तशहरातील वाहतूक विस्कळीत करण्यात ट्रॅव्हल्सवाल्यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय स्टार बसचे चालकही मनात येईल तिथे बस उभ्या करतात. या सर्वांवरच यापुढे कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.विद्यार्थी पालकांना त्रास होणार नाहीवाहतूक शाखेचे पोलीस वाहनचालकांसोबत खासकरून विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उर्मटपणे वागतात, अशा सार्वत्रिक तक्रारी आहेत. सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लगबग असते. अनेकदा घाईगडबडीमुळे विद्यार्थी, पालक हेल्मेट, लायसेन्स वगैरे विसरतात. वाहतूक पोलीस त्यांना थांबवून विनाकारण त्रास देतात. त्यांचा वेळ वाया जाईल यावर पोलिसांचा भर असतो. या संबंधाने उजर केल्यास वाहतूक पोलीस उर्मटपणे वागतात. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. हा प्रकार लक्षात आणून दिला असता, उपायुक्त भरणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा संपेपर्यंत त्रास होणार नाही, त्यांची तपासणी केली जाणार नाही, अशी हमी त्यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी सौजन्याने वागावे यासाठी समुपदेशन वर्ग घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर