शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता न देणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण

By admin | Updated: April 7, 2016 03:10 IST

उत्तर नागपुरातील वादातीत संघटनेशी संबंधित गुन्हेगाराने जनरेटर भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीला हप्ता न दिल्यामुळे मारहाण केली.

उत्तर नागपुरात गुन्हेगारांची दहशत : २० हजार रुपयाचा मागितला हप्ता नागपूर : उत्तर नागपुरातील वादातीत संघटनेशी संबंधित गुन्हेगाराने जनरेटर भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीला हप्ता न दिल्यामुळे मारहाण केली. ही घटना जरीपटका येथील मंगळवारी बाजारात घडली. मनोज बन्सोड आणि त्याचा साथीदार अशी आरोपीची नावे आहे. विनोबा भावेनगर येथील राजेश बिजेकर (३२) हा आठवडी बाजारात जनरेटरने दुकानदारांना वीज पुरवठा करण्याचे काम करतो. मंगळवारी जरीपटका येथे आठवडी बाजार भरतो. दुपारी ४ वाजता राजेश नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता. यादरम्यान मनोज बन्सोड आपल्या साथीदारासोबत आला. त्याने राजेशला २० हजार रुपयाची मागणी केली. नकार दिल्याने मारहाण करीत हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे बाजारात तणाव निर्माण झाला. दुकानदार आपले दुकान बंद करू लागले. यापूर्वीसुद्धा हप्ता न दिल्यामुळे धमकी मिळत असल्याने त्रस्त राजेशने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मनोज बन्सोडच्या विरुद्ध हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा दंगा, मारहाण आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याची दहशत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून उत्तर नागपुरातील एका संघटनेशी जुळलेला आहे. पोलीस गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोका व एमपीडीएची कारवाई करीत आहे. परंतु तरीही गुन्हेगार दिवसाढवळ्या हप्ता वसुली करीत आहेत. मनोज व त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले नसल्याने राजेश दहशतीत आहे. (प्रतिनिधी)वर्गणीच्या नावावर वसुली गुन्हेगारी प्रवृत्तीची ही मंडळी आठवडी बाजार व परिसरात वर्गणीच्या नावावर हप्ता वसुली करीत आहे. न देणाऱ्याला धमकी दिली जात आहे. या गुन्हेगारांमुळे आठवडी बाजारातील भाजीविक्रेते, पातठेले आणि फुटपाथ विक्रेते त्रस्त झाले आहेत.