जीएसटीच्या कठोर तरतूदींची व्यावसायिकांना अडचण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:34+5:302021-01-09T04:07:34+5:30
नागपूर : जीएसटीच्या कठोर तरतुदींचे पालन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या संदर्भातील सूचनांचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे ...

जीएसटीच्या कठोर तरतूदींची व्यावसायिकांना अडचण ()
नागपूर : जीएसटीच्या कठोर तरतुदींचे पालन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या संदर्भातील सूचनांचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधीमंडळाने सीजीएसटी नागपूर झोन-१ चे प्रधान आयुक्त बलवीर सिंह आणि झोन-२ चे आयुक्त आर.एस. माहेश्वरी यांना दिले.
मेहाडिया म्हणाले, जीएसटीचे पालन करण्यासाठी केंद्र सरकार आणि जीएसटी विभागाने विविध तरतुदी आणि नियमांमध्ये केलेल्या बदलांचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. पण सध्या काही तरतुदींमुळे करदाता व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. या दरम्यान जीएसटी विभाग जानेवारीपासून क्यूआरएमपी योजना लागू करीत असून त्याअंतर्गत करांचे भुगतान तिमाही आणि रिटर्नच्या आधारावर राहणार आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, विभागाने विभिन्न आधारावर करदात्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जीएसटी रिटर्न फाईल करण्यात करदात्यांची काही चूक होत असेल तर त्यांचे रजिस्ट्रेशन विभागाने रद्द करू नये. हा निर्णय अन्यायकारक आहे. चेंबरचे उपाध्यक्ष फारुखभाई अकबानी म्हणाले, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता जीएसटी ऑडिट व वार्षिक रिटर्नची अंतिम तारीख वाढवावी. चेंबरच्या अप्रत्यक्ष कर समितीचे संयोजक सीए रितेश मेहता यांनी करदात्यांच्या समस्या मांडल्या.
या संदर्भात बलवीर सिंह व आर.एस. माहेश्वरी म्हणाले, व्यापाऱ्यांच्या समस्या केंद्रीय समितीसमोर मांडून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, सहसचिव उमेश पटेल तथा विधान अग्रवाल उपस्थित होते.