शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

थकीत कर वसुली करण्यात दिरंगाई करण्याऱ्यांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:13 AM

थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.

ठळक मुद्देनागपूर मनपा कर सभापतींचा इशारा 

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या यशश्री नंदनवार, माधुरी ठाकरे, भावना लोणारे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम, सर्व झोन आयुक्त सुवर्णा दखने, महेश मोरोणे, राजू भिवगडे, स्मिता काळे, राजेश कराडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरीश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.आॅगस्ट महिन्यात झालेल्या झोननिहाय कर विभागाच्या बैठकीमध्ये कर निरीक्षकांना थकीत कर वसुलीचे पहिल्या त्रैमासिकचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या त्रैमासिकाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण का झाले नाही, असा सवाल त्यांनी झोन सहायक आयुक्तांना विचारला. यावर झोन सहायक आयुक्तांनी ३१ आॅक्टोबरपर्यत पहिल्या त्रैमासिक थकीत कर वसुली पूर्ण करू, असे आश्वासन दिले. ३१ आॅक्टोबर पर्यंत वसुली न झाल्यास पुढील कार्यवाही काय करणार, असे सभापती संदीप जाधव यांनी उपायुक्त राजेश मोहिते यांनी विचारले असता, ३१ आॅक्टोबर पर्यंत थकीत वसुली नाही झाली तर कामात दिरंगाई करणाऱ्या व कामचुकारपणा करणऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा विश्वास उपायुक्त राजेश मोहिते यांनी दिला. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवसाचा वेळ देण्यात यावा, सात दिवसाच्या आत त्यांची परिस्थिती समाधानकारक न दिसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले.प्रारंभी सभापती संदीप जाधव यांनी पहिल्या त्रैमासिक थकीत कर वुसलीचा आढावा सर्व झोन सहायक आयुक्तांमार्फत घेतला. पहिल्या त्रैमासिक करांची वसुली अद्याप नाही झाली आहे. दुसऱ्या त्रैमासिक कर वसुलीची थकीत बाकीदेखील वाढेल. कर वसुलीसंदभार्तील कार्यवाही अत्यंत कमी आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. २०१८- १९ च्या अर्थसंकल्पात ५१९ कोटीचे उत्पन्न हे कर वसुलीद्वारे अपेक्षित होते. त्या लक्षाचे निम्मेही लक्ष अद्याप आपल्याला गाठता आले नाही, यावर देखील प्रशासनाने विचार करावा, असेही सभापती जाधव यांनी सांगितले. ज्या झोनमध्ये मनुष्यबळ कमी आहे, त्या झोनमध्ये मनुष्यबळ पुरविण्याची शिफारस प्रशासनाकडे आपण करू, असे आश्वासन संदीप जाधव यांनी दिले.कर वसुली संदर्भात प्रशासनाने एक नवीन धोरण तयार करायला हवे. एक वॉरंट टीम तयार करून आपल्या उपद्रव शोध पथकाद्वारे थकीत कर वसुली करण्यात यावी, याबाबत विचार करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सूचित केले. यापुढे मालमत्ता देयकाची तपासणी करूनच ते वितरीत करण्यात यावे, असे निर्देश सभापतींनी दिले. आपेक्षार्ह असलेले प्रकरण शक्यतो झोनस्तरावर सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे आपेक्षार्ह प्रलंबित प्रकरण मुख्यालयात असतील त्यांचा निपटारा त्वरित करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर