शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसंस्था टिकण्यासाठी पाया बळकट हवा

By admin | Updated: May 2, 2015 02:12 IST

कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश न्यायसंस्थेचा पाया आहेत. हा पाया बळकट असला तरच न्यायसंस्थेची इमारत टिकेल,

नागपूर : कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश न्यायसंस्थेचा पाया आहेत. हा पाया बळकट असला तरच न्यायसंस्थेची इमारत टिकेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवातर्फे आयोजित ‘ज्युडिशियल सर्व्हिस अ‍ॅज अ करिअर’ या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे शुक्रवारी न्या. गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी व सेंट्रल कॉलेज आॅफ लॉचे प्राचार्य डॉ. एस. एम. राजन प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम नागपूर खंडपीठाच्या सभागृहात झाला.न्या. गवई म्हणाले, नवीन वकिलांच्या इंग्रजीची फार वाईट अवस्था आहे. चांगले न्यायाधीश होण्यासाठी स्वत:ला परिपूर्ण करणे आवश्यक आहे. परिश्रमाशिवाय कुणालाही फळ मिळत नाही. भारतीय न्यायसंस्थेला सक्षम न्यायाधीशांची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक व आर्थिक समानता हवी होती. यामुळे राज्यघटनेत ‘शेड्युल-९’चा समावेश करण्यात आला. ‘शेड्युल-९’मधील कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. परंतु, संबंधित कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहेत किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार न्यायालयांना आहे, असे सांगून त्यांनी बार कौन्सिलच्या उपक्रमाची प्रशंसा केली.न्या. चौधरी यांनी बार कौन्सिलतर्फे दर्जेदार न्यायाधीश व वकील घडविण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगून याबाबत आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांनी वकिलांच्या इंग्रजीवर चिंता व्यक्त केली. वकिलांना पायाभूत इंग्रजी आलीच पाहिजे असे मत नोंदवून त्यांनी यासंदर्भात बार कौन्सिलने मार्गदर्शन करण्याची सूचना केली.डॉ. राजन यांनी राज्यघटनेतील ‘शेड्युल-९’चा उद्देश पूर्ण झाल्यामुळे ते रद्द करणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायाधीश न्यायदानाचे महान कार्य करीत असतात. समाजात शांतता नांदण्यासाठी सर्वांना न्याय मिळणे आवश्यक आहे. न्यायाधीश होणाऱ्या सर्व वकिलांनी ही बाब लक्षात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.व्यासपीठावर कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पाटील, माजी अध्यक्ष अ‍ॅड. ए. यू. पठाण, माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जाईभावे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अनिरुद्ध चौबे उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)