फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते! सचिन पिळगावकर यांचा ‘आर्यन खान’ प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:11 PM2021-10-09T20:11:49+5:302021-10-09T20:12:19+5:30

Nagpur News फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते, असा अप्रत्यक्ष टोला प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक सचिन पिळगावकर यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान मादक द्रव्य प्रकरणावर हाणला.

The storm of what happens in the film industry rises everywhere! Sachin Pilgaonkar's indirect attack on 'Aryan Khan' case | फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते! सचिन पिळगावकर यांचा ‘आर्यन खान’ प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला

फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते! सचिन पिळगावकर यांचा ‘आर्यन खान’ प्रकरणावर अप्रत्यक्ष टोला

Next

नागपूर : फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे घडते, त्याचे वादळ सर्वत्र उठते, असा अप्रत्यक्ष टोला प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक सचिन पिळगावकर यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान मादक द्रव्य प्रकरणावर मारला. (The storm of what happens in the film industry rises everywhere! Sachin Pilgaonkar's indirect attack on 'Aryan Khan' case)

ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीच्या बॅनरखाली रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा ग्रुप, वाशिमच्या ‘अखियां के झरोखो से’ या कार्यक्रमाला शनिवारी त्यांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. रवींद्र जैन यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

फिल्म इंडस्ट्री असो वा सर्वसामान्य जीवन, प्रत्येक ठिकाणी माता-पित्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना योग्य अनुशासनात ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचा गोंधळ सर्वत्र उठवल्या जातो. ती न्यूज बनते. मात्र, अशा घटना सर्वत्र घडत आहेत. त्या न्यूज बनत नाहीत, हाच तो फरक असल्याचे सचिन यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे, सचिन यांची मुलगी श्रिया हिने शाहरुखच्या ‘फॅन’ या चित्रपटातूनच बॉलिवूड डेब्यू केला होता.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर बोलतानाही त्यांनी आपले मत ठेवत आरोप लावणे खूप सोपे असल्याचे म्हटले. मी हिंदीत कमी दिसत गेलाे, यापेक्षा वास्तव वेगळे आहे. मला हिंदी चित्रपटांसाठी नंतर वेळच उरला नाही. माझे चित्रपट सतत हिट होत गेले. माझी मातृभाषा मराठी आहे आणि त्यात मी रमलो. ज्याला मराठीविषयी अभिमान वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडायला हवा, असे परखड मतही सचिन पिळगावकर यांनी यावेळी व्यक्त केले. सचिन यांची मुलाखत महेश तिवारी यांनी घेतली.

...........

Web Title: The storm of what happens in the film industry rises everywhere! Sachin Pilgaonkar's indirect attack on 'Aryan Khan' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.