धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनीत गाड्यांना थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:18 IST2019-10-05T01:14:33+5:302019-10-05T01:18:28+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी रेल्वेस्थानकावर मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनीत गाड्यांना थांबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी रेल्वेस्थानकावर मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ ऑक्टोबरला अजनी रेल्वेस्थानकावर अप लाईनच्या १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १८४२१ पुरी-अजमेर एक्स्प्रेस थांबणार आहे. तसेच ८ ऑक्टोबरला डाऊन लाईनच्या १२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेस, २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस, १२४०५ बिलासपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टनम एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, २२८२८ सुरत-पुरी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरला अप लाईनवर २२८८८ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस, १२१४६ भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे.