शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची बदनामी थांबवा, अन्यथा गौप्यस्फोट करेन"; नाना पटोलेंचा मित्रपक्षांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:53 IST

Nagpur: राज्यातील राजकारण सध्या विविध पोटनिवडणुका आणि अंतर्गत कलहामुळे तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली आहे.

नागपूर : राज्यातील राजकारण सध्या विविध पोटनिवडणुका आणि अंतर्गत कलहामुळे तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना पटोले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, जर काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तर मी सर्व सत्य समोर आणून पर्दाफाश करेन,असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

​‘सामना’च्या टीकेवर पटोले आक्रमक: "कुणाच्या दबावाखाली होता?

​'सामना'मधील अग्रलेखातून होणाऱ्या टीकेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मला यावर भाष्य करायचे नव्हते, पण वारंवार काँग्रेसची बदनामी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसचा अध्यक्ष कुणाच्या दबावाखाली होऊ दिला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. हायकमांडची परवानगी घेऊन मी त्या सर्व घडामोडींचा पर्दाफाश करेन, ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका.

​"राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार"

​राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, "पुढच्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल. भाजप आपल्याच मित्रपक्षांना संपवण्याचा कट रचत आहे. केवळ निधीच नाही, तर राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम सुरू आहे. 'अशोक खरात फाईल्स'मधून अनेक गोष्टी समोर येतील. सत्तेतील काही लोक मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा 'गेम' कसा होतो हे लवकरच दिसेल.

​बारामती आणि राहुरी: हे तर राजकीय युद्ध

​बारामती पोटनिवडणुकीवर बोलताना पटोले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे संकेत दिले. "हायकमांडने बारामती लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक युद्ध आहे आणि युद्धात काय होते ते १३ तारखेला (अर्ज माघारीच्या दिवशी) स्पष्ट होईल. मित्रपक्ष काँग्रेसला वारंवार डिवचत असले तरी आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

​गडकरी आणि नितेश राणेंवर निशाणा

​नितीन गडकरींच्या विधानांचा समाचार घेताना पटोले म्हणाले, गडकरी साहेबांबद्दल मला आदर आहे, पण त्यांनी इतिहासातील ब्राह्मण व्यवस्थेने ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांना दिलेल्या त्रासावरही बोलावे. ती व्यवस्था आजही संपलेली नाही. दरम्यान, नितेश राणे यांच्या धार्मिक विधानांवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले की, अशा चिथावणीखोर मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवणे सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे.

​प्रफुल पटेलांबाबत सहानुभूती

अजित पवार गटातील अंतर्गत वादावर बोलताना पटोले यांनी प्रफुल पटेल यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. "प्रफुल पटेल यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारण सांभाळले आहे. त्यांच्यावर जर पक्षात अन्याय होत असेल, तर ते पाहून आम्हालाही वाईट वाटते, असे सूचक विधान त्यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop Defaming Congress or I will Expose Secrets: Nana Patole

Web Summary : Nana Patole warns allies against defaming Congress, threatening exposure. He predicts political upheaval in Maharashtra, alleging BJP aims to eliminate allies. Patole criticizes Gadkari, Rane and sympathizes with Praful Patel.
टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसVidarbhaविदर्भnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी