मतपत्रिकांच्या गठ्ठ्यात सापडले कलंक पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:18+5:302020-12-04T04:24:18+5:30
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान वेगळीच बाब पहायला मिळाली. मतपत्रिकांना एकत्रित करण्याचे काम सुरू असताना चक्क ...

मतपत्रिकांच्या गठ्ठ्यात सापडले कलंक पत्र
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर
पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान वेगळीच बाब पहायला मिळाली. मतपत्रिकांना एकत्रित करण्याचे काम सुरू असताना चक्क राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या नावाने लिहिलेली पत्रे आढळून आली. महाराष्ट्र राज्यातील कलंक या नावाने ही पत्रे होती.
विना अनुदानित धोरण बंद करून सर्व शाळा १०० टक्के अनुदानित करण्यात याव्या किंवा सर्व शाळा बंद करून हुकूमशाही लागू
करा व आम्हाला फाशी द्या, असा यात मजकूर होता. निधी वितरणाचा शासन निर्देश लवकरात
लवकर लागू करण्यात यावा व सेवा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यात करण्यात आली.
मतमोजणी केंद्रावर अशी पत्रे बाहेर काढण्यात आली.