शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार

By admin | Updated: August 16, 2016 22:18 IST

उपराजधानीतील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 16 - उपराजधानीतील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे आयटीआयला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत संतप्त विद्यार्थी परिसरात उपस्थित होते.आयटीआयची प्रवेशप्रक्रिया चार टप्प्यात घेण्यात आली. हे टप्पे आटोपल्यानंतरदेखील १४९ जागा शिल्लक होत्या. या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी ह्यआयटीआयह्णमध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थी तर सोमवारी रात्रीपासूनच रांगेमध्ये लागले होते. मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशाची एकच खिडकी होती व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना प्रवेशासाठी ह्यटोकनह्ण देण्यात येत होते. यावेळी काही विद्यार्थी व बाहेरील व्यक्ती रांगेत शिरून ह्यटोकनह्ण घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान, सर्व जागांवर प्रवेश झाले असून आता ह्यटोकनह्ण देण्यात येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेमध्ये धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परंतु गर्दी जास्त असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना मुका मार लागला.