राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २९ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:09 IST2018-12-22T01:08:09+5:302018-12-22T01:09:26+5:30
पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन २९ आणि ३० डिसेंबरला दीक्षाभूमी मार्गावरील बी. आर. मुंडले अंध शाळा, अंध विद्यालयाच्या प्लॅटिनम सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २९ पासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन २९ आणि ३० डिसेंबरला दीक्षाभूमी मार्गावरील बी. आर. मुंडले अंध शाळा, अंध विद्यालयाच्या प्लॅटिनम सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनात २९ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता ग्रंथदिंडी, २.३० वाजता ग्रंथपूजन होईल. दुसऱ्या सत्रात ३.३० वाजता राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार, संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते होईल. तिसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता ‘गर्भरेशमी’ नाट्य संगीताचा नजराणा, सायंकाळी ७ वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. ३० डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता बदलती आव्हानं आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद, सकाळी ११ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, दुपारी २.३० वाजता कृष्णबावरी नृत्य नाट्य आविष्कार, दुपारी ४.३० वाजता या हृदयीचे त्या हृदयी यात सुधीर गाडगीळ यांची मुलाखत होईल. सायंकाळी ६.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिमा इंगोले राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल रवि थोडगे, संदीप जोशी, संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांची प्रमुख उपस्थिती राहील.