'संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते...'; राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात

By योगेश पांडे | Updated: October 6, 2023 18:21 IST2023-10-06T18:21:15+5:302023-10-06T18:21:50+5:30

यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

State Housing Minister Atul Save visit rss reshimbag Nagpur | 'संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते...'; राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात

'संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते...'; राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात

नागपूर : राज्याचे गृहनिर्माण तसेच इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

अतुल सावे काही शासकीय कार्यक्रमांसाठी नागपुरात आले होते. त्यांचा एक कार्यक्रम रेशीमबागेतदेखील होता. त्यावेळीच त्यांनी स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते. हेडगेवार यांनी दूरदर्शी विचार देशाच्या बांधणी व सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शक ठरत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांना संघ पदाधिकाऱ्यांनी संघकार्यांची माहितीदेखील दिली.
 

Web Title: State Housing Minister Atul Save visit rss reshimbag Nagpur