शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

एक्स-रे साठी खासदारांना केले स्टुलवर उभे

By admin | Updated: January 28, 2017 02:03 IST

गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या एका खासदारांना मोडकळीस आलेल्या टेबलवर उभे करून ‘एक्स-रे’ करण्यात आला.

मेडिकलमधील प्रकार : दोन एक्स-रे मशीन बंदनागपूर : गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या एका खासदारांना मोडकळीस आलेल्या टेबलवर उभे करून ‘एक्स-रे’ करण्यात आला. मेडिकलच्या एक्स-रे विभागाच्या या प्रकारामुळे खासदारांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, गेल्या एक महिन्यापासून दोन एक्स-रे मशीन बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवरही धरले.१४०० खाटांच्या या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु सोयी असून त्याला कार्यान्वित ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने रुग्णसेवेवर याचा प्रभाव पडत आहे. मेडिकलच्या क्ष-किरण विभागात चार एक्स-रे मशीन आहेत. यातील एक मशीन भंगारात काढण्यात आली आहे. तर मागील महिन्यात दोन मशीनची ट्यूब नादुरुस्त झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. केवळ एकच मशीन सुरू आहे. परिणामी, एक्स-रे साठी रुग्णांवर दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. यातच सोमवारी खासदार कृपाल तुमाने गुडघे दुखण्याच्या उपचारासाठी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांच्याकडे आले असता त्यांना विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी सांगितले, डॉ. मित्रा यांनी तपासून एक्स-रे विभागात पाठविले. परंतु या विभागातील कर्मचाऱ्याने गुडघ्याच्या ‘एक्स-रे’साठी मोडकळीस आलेल्या स्टूलवर उभे केले. एक्स-रे झाल्यावर या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, मशीन एवढ्या खाली जात नसल्याने रुग्णाला स्टुलवर उभे केले जात असल्याचे उत्तर मिळाले. बाहेर रुग्णांच्या गर्दीविषयी विचारले, असता गेल्या महिन्याभरपासून तीनपैकी एकच मशीन सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधीक्षकांना दिली व तत्काळ बंद मशीन सुरू करण्याच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)