मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आज ठिय्या
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:29+5:302015-12-05T09:09:29+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आज ठिय्या
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयापासून दुपारी १२ वाजता हे आंदोलन सुरू होईल. दिवसभर धरमपेठच्या त्रिकोणी पार्क येथे ठिय्या देणार असल्याचे समितीचे संयोजक राम नेवले यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी विदर्भातील जनतेला स्वतंत्र्य राज्य देण्यासह शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
मात्र सत्तेत येताच हे सर्व आश्वासने हवेत विरली असून सरकारने गेल्या वर्षभरात एकही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप नेवले यांनी केला आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे ते म्हणाले. या आश्वासनांचे काय झाले, असा जाब मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी सांगितले.(प्रतिनिधी)