शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

नागपुरातील पाचपावलीत तलवारींचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 1:14 AM

बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा घालून दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्दे२० तलवारींचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा घालून दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार टोकाला पोहोचला असून, या प्रचारात काही गुंड आणि उपद्रवी मंडळीही सहभागी झाली आहे. या समाजकंटकांकडून मतदान प्रक्रियेत खोडा घातला जाऊ शकतो, हे ध्यानात आल्याने शहर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील अवैध धंदे करणारे, दारू विक्री करणारे तसेच गुंडांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी विविध झोपडपट्ट्यांमध्ये पोलीस कसून तपासणी करीत आहेत. पाचपावलीचे पोलीस अशाच प्रकारे मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत कोम्बिंग आॅपरेशन करीत असताना त्यांना या भागातील कुख्यात गुन्हेगार प्रणय सुधाकर पाटील आणि संग्राम ऊर्फ राजा पाठक यांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची जमवाजमव केल्याचे कळले. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांनी कुख्यात संग्राम पाठक याच्या घरी मंगळवारी पहाटे ४ वाजता छापा घातला. यावेळी तेथे संग्रामसोबतच कुख्यात प्रणय पाटीलही मिळाला. या दोघांना ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता संग्रामच्या घरात तब्बल २० तलवारी आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक सुरोसे, हवालदार विजय यादव, नायक राजेश देशमुख, विलास चव्हाण आणि महेश जाधव यांनी ही कामगिरी बजावली.प्रणय पाटील हिस्ट्रीशिटर गुन्हेगारपोलिसांनी अटक केलेला प्रणय सुधाकर पाटील या हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर, संग्राम पाठकविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा पोलिसांनी दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. पाचपावली पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी पंजाबमधील शस्त्रतस्कर परमजितसिंग पटिये याला अटक करून त्याच्याकडून १० तलवारी जप्त केल्या होत्या. कुख्यात प्रणय आणि संग्रामचे पटियेसोबत गुन्हेगारी कनेक्शन प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पोलीस पटियेलाही अटक करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक