शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

प्रॉन्स व फिश करीवर श्रीलंकन क्रिकेटपटू लट्टू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:38 AM

भारताविरुद्ध शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी येथे आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना नागपूरच्या भोजनाची चव आवडली आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या भोजनाची चाखली चव कॉन्टिनेंटल व चायनीजवर भर

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारताविरुद्ध शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी येथे आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना नागपूरच्या भोजनाची चव आवडली आहे. संत्रानगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या या शहराने शेजारी देशाच्या खेळाडूंचे केलेले आदरतिथ्य त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. सामन्याचा निकाल काहीही असो, पण या भोजनाचा स्वाद मात्र त्यांना जीवनभर आठवणीत राहील.बुधवारी सकाळच्या सत्रात जामठामध्ये सरावसत्रादरम्यान घाम गाळल्यानंतर श्रीलंका संघातील जवळजवळ सर्वंच खेळाडू वर्धा मार्गावरील हॉटेल ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’मध्ये दाखल झाले. वेळ होती सायंकाळी ७-७.१५ ची. बिग बाजारच्या मागच्या बोळीतील हॉटेलजवळ थांबलेल्या बसमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.कडक सुरक्षा व्यवस्थेत दाखल झालेल्या या बसमध्ये श्रीलंकेचे खेळाडू होते. ते हॉटेलमध्ये दाखल होताच त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.जवळजवळ दोन तास खेळाडू हॉटेलमध्ये होते. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक खेळाडूंनी कॉन्टिनेंटल व चायनीज भोजनाचा आस्वाद घेतला.श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी प्रांज, फिश करी, चिकन बटर मसाला, नूडल्स आदी व्यंजनांना पसंती दर्शवली. नजिकच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात कसून सराव करणाऱ्या पाहुण्या संघातील खेळाडूंनी ‘नागपुरी भोजना’चा आस्वाद घेण्याचे निश्चित केले होते.दुपारी ३.३० वाजता हॉटेल व्यवस्थापनाला श्रीलंका संघाच्या भोजनाच्या कार्यक्रमाची सूचना मिळाली. हॉटेल व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कदाचित श्रीलंका संघातील खेळाडूंनी हॉटेलची निवड गुगलवरील रिव्ह्यूद्वारे केली असावी.

रोशनला संक्रमणाचा त्रासश्रीलंकेचे खेळाडू भोजनाचा आस्वाद घेत असताना एक युवा खेळाडू डोळ्यावर पट्टी बांधून हॉटेलच्या बाहेर येताना दिसला. माहिती काढली असता तो श्रीलंकेचा युवा खेळाडू रोशन सिल्वा होता. त्याला  संकमणाचा त्रास झाला होता.

टॅग्स :foodअन्नCricketक्रिकेट