नागपुरात भरधाव कारची ९ जणांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:59 AM2019-02-15T00:59:26+5:302019-02-15T01:00:13+5:30

काटोल मार्गावरील फ्रेण्डस कॉलनीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने अनेकांना धडक मारली. त्यामुळे तीन महिलांसह ९ जण जबर जखमी झाले. आज रात्री ९ च्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Speedy car dash to 9 people in Nagpur | नागपुरात भरधाव कारची ९ जणांना धडक

नागपुरात भरधाव कारची ९ जणांना धडक

Next
ठळक मुद्देकाटोल मार्गावर अपघात : प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल मार्गावरील फ्रेण्डस कॉलनीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने अनेकांना धडक मारली. त्यामुळे तीन महिलांसह ९ जण जबर जखमी झाले. आज रात्री ९ च्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, काटोल मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ एक लॉन आहे. लॉनमधील विवाह समारंभ आटोपून पाहुणे पायी रस्ताने जात होते. तेवढ्यात वेगात आलेल्या एका कारने तीन महिला आणि सहा पुरुषांना जोरदार धडक दिली. या अपघातामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने पाठलाग करून पळून जाणा-या कारचालकाला पकडले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती कळताच गिट्टीखदान पोलीस तेथे पोहचले. वृत्त लिहिस्तोवर जखमींची तसेच आरोपी कारचालकाचे नाव कळू शकले नाही. तो दारूच्या नशेत टून्न होता, असे समजते.

Web Title: Speedy car dash to 9 people in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.