- नरेश डोंगरे नागपूर - ईटारसी नागपूर दरम्यान तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या थर्ड लाईनवर मध्य रेल्वेकडून आज शुक्रवारी स्पीड ट्रायल घेतली जाणार आहे. चिंचोडा -मुलताई दरम्यान पूर्ण झालेल्या १५.२६ किलोमिटरच्या ट्रॅकवर रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीसीआरएस) यांच्या देखरेखित ही स्पेशल स्पीड ट्रायल (वेगाची चाचणी) घेतली जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चिंचोडा मुलताई मार्गावर रेल्वेच्या थर्ड लाईन (तिसरा मार्ग) आधुनिक अभियांत्रिकी मानकांप्रमाणे पूर्ण करण्यात आले. जे काम पूर्ण झाले त्या मार्गात १ रोड ओव्हर ब्रीज (आरओबी) आणि २५ छोट्या पुलांची बांधणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक लिमिटेड हाइट सबवे (एलएचएस)चाही समावेश आहे. लेव्हल क्रॉसिंग क्रमांक २६५ ची तरतूद करण्यात आली असून मुलताई स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग (पुनर्रचना) करण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे रेल्वे परिचालन क्षमता वाढणार आहे.
शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या वेग चाचणीदरम्यान ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, सिग्नलिंग तसेच दूरसंचार यांसह सर्व तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यात येईल. त्यातूनच सर्वोच्च स्तराची सुरक्षितता निश्चित केली जाणार आहे.
गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण कमी होणारतिसरा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर व्यस्त असणाऱ्या या रेल्वे मार्गावर गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण कमी होऊन प्रवासी तसेच मालवाहतूक अधिक गतीमान होईल. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन रेल्वे पायाभूत सुविधाही सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.
Web Summary : Central Railway will conduct a speed trial on the Nagpur-Itarsi third line. The Railway Safety Commissioner will oversee the inspection of the Chinchoda-Multai section, ensuring safety and improved rail operations. This upgrade aims to reduce train delays and boost freight transport efficiency.
Web Summary : मध्य रेलवे नागपुर-इटारसी तीसरी लाइन पर स्पीड ट्रायल करेगी। रेलवे सुरक्षा आयुक्त चिंचोड़ा-मुलताई खंड का निरीक्षण करेंगे, जिससे सुरक्षा सुनिश्चित होगी और रेल संचालन में सुधार होगा। इस उन्नयन का उद्देश्य ट्रेन में देरी को कम करना और माल परिवहन दक्षता को बढ़ाना है।