‘आपली बस’ची रिंग रोडवर विशेष सेवा चक्री सेवा

By मंगेश व्यवहारे | Updated: August 29, 2023 14:14 IST2023-08-29T14:11:45+5:302023-08-29T14:14:14+5:30

विशेष बस सेवेचा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांनाच लाभ

Special service circular service of 'Aapli Bus' on ring road | ‘आपली बस’ची रिंग रोडवर विशेष सेवा चक्री सेवा

‘आपली बस’ची रिंग रोडवर विशेष सेवा चक्री सेवा

मंगेश व्यवहारे, नागपूर: महानगरपालिकेद्वारे ‘आपली बस’ची रिंग रोडवर विशेष चक्री सेवा सुरू झाली आहे. मनपाच्या ‘आपली बस’ परिवहन सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक १४ वरून बस चक्री सेवा सकाळी ७.१५ वाजतापासून ही सेवा सुरू होते. सकाळी ७.१५ वाजता ऑरेंज सिटी स्ट्रीट डेपो हिंगणा ते हिंगणा नाका, ७.३० वाजता हिंगणा नाका ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन, सकाळी १० वाजता वासुदेवनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा नाका, दुपारी २.५० वाजता हिंगणा नाका ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन, सायंकाळी ५.२० वाजता वासुदेवनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा नाका आणि सायंकाळी ७.३५ वाजता हिंगणा नाका ते ऑरेंट स्ट्रीट डेपो हिंगणा या वेळापत्रकानुसार ही सेवा चालेल. मनपाच्या या विशेष बस सेवेचा मार्गावरील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांना लाभ होत आहे.

Web Title: Special service circular service of 'Aapli Bus' on ring road

टॅग्स :nagpurनागपूर