शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

नागपुरात महिलांच्या विशेष बसेस इलेक्ट्रिकवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:48 PM

तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या  परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देमनपा तेजस्विनी योजनेतून पाच बसेस खरेदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या  परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.तेजस्विनी योजनेंतर्गत महिला व युवतींसाठी विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस गुलाबी रंगाची राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला डिझेलऐवजी इलेक्ट्रिक व बायोडिझेलवर धावणाऱ्या  बसेस सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दोन दिवसातच परिवहन समितीने तेजस्विनी योजनेंतर्गत पाच बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस पर्यावरण पूरक असून डिझेलवर होणाºया खर्चात बचत होणार आहे.परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यादृष्टीने पुढील बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यात बस स्थानकांचे बांधकाम करण्याचे अधिकार वाहतूक विभागाऐवजी परिवहन विभागाला देण्यात येतील. सोबतच जाहिरात एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.परिवहन विभागाचा डिझेलवर धावणाऱ्या  बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. परंतु खर्चाचा विचार करता इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या  बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रस्तावात बदल करण्यात आला. तसेच बायोडिझेल व सीएनजीवर बसेस चालविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.ई-तिकीट मशीनचा प्रस्ताव अडकणारवेरिफोन ई-तिकीट मशीनची खरेदी समितीची मंजुरी न घेता करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी समितीपुढे ठेवला जाणार आहे. परंतु मशीन खरेदीबाबतचा प्रश्न परिवहन समितीचे सदस्य नितीन साठवणे यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे या प्रस्तावाला समितीत मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.प्रशिक्षण न देताच मशीनचा वापरपरिवहन विभागाने खरेदी केलेल्या ई-तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु वाहकांना या मशीनचा वापर करता येत नाही. वास्तविक या मशीनचा वापर करण्याबाबत वाहकांना प्रशिक्षण देण्याची गरज होती. त्यामुळे तिकीट न देता पैसे गोळा क रण्यात येतात. ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी