बम्लेश्वरी माता जत्रेसाठी डोंगरगडला १० गाड्यांचा थांबा दपूम रेल्वेचे विशेष नियोजन
By नरेश डोंगरे | Updated: March 25, 2025 22:41 IST2025-03-25T22:41:06+5:302025-03-25T22:41:31+5:30
चैत्र नवरात्रात डोंगरगडला मातेश्वरीची भव्य यात्रा भरते.

बम्लेश्वरी माता जत्रेसाठी डोंगरगडला १० गाड्यांचा थांबा दपूम रेल्वेचे विशेष नियोजन
नरेश डोंगरे
लोकमत नागपूर : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बम्लेश्वरी मातेच्या जत्रेनिमित्त दूरदूरचे भाविक डोंगरगडला येत असल्याचे ध्यानात घेऊन दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेने डोंगरगड स्थानकावर १० रेल्वे गाड्यांना थांबा घोषित केला आहे.
चैत्र नवरात्रात डोंगरगडला मातेश्वरीची भव्य यात्रा भरते. जत्रा कालावधीत तेथे देश-विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. सर्वाधिक भाविक रेल्वे गाड्यांनी डोंगरगडला पोहचत असल्याचे लक्षात घेत दपूम रेल्वेने यावेळी ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत डोंगरगड स्थानकावर १० रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा घोषित केला आहे.
ट्रेन नंबर २०८४३ बिलासपूर - भगत की कोटी (रात्री ९.५६ वाजता डोंगरगड स्थानकावर येणार, ९.५८ ला प्रस्थान करणार), २०८४४ भगत की कोटी- बिलासपूर (पहाटे ५.४० वाजता येणार, ५.४२ ला पुढे जाणार), २०८४५ बिलासपूर -बिकानेर (रात्री ९.५६ ला येणार, ९.५८ ला मार्गस्थ होणार), २०८४६ बिकानेर-बिलासपूर (पहाटे ५.४० ला येणार, ५.४२ ला मार्गस्थ होणार), २०८५१ बिलासपूर मद्रास (दुपारी १२.१६ ला येणार, १२.१८ वाजता पुढे जाणार), २०८५२ मद्रास-बिलासपूर (सकाळी १० .३३ ला आगमन, १०.३५ ला प्रस्थान), १२८४९ बिलासपूर -पुणे (दुपारी २.३६ ला आगमन, २.३८ ला प्रस्थान), १२८५० पुणे -बिलासपूर(दुपारी १२.५ ला आगमन, १२.७ ला प्रस्थान), १२७७२ रायपूर-सिकंदराबाद (सायंकाळी ६.३० ला आगमन, ६.३२ ला प्रस्थान) आणि ट्रेन नंबर १२७७१ सिकंदराबाद रायपूर (सकाळी १०.४६ ला आगमन आणि १०.४८ ला प्रस्थान) या त्या १० रेल्वे गाड्या आहेत.
गाड्यांचा विस्तार, स्पेशल ट्रेनही धावणार
याच कालावधीत ट्रेन नंबर ६८७४२/ ६८७४१ गोंदिया दुर्ग गोंदिया ही गाडी रायपूरपर्यंत धावणार आहे. तर, ट्रेन नंबर ६८७२९ रायपूर डोंगरगड रायपूर ही मेमू ट्रेन गोंदियापर्यंत धावणार आहे. ट्रेन नंबर ०८७०९/०८७१० डोंगरगड दुर्ग डोंगरगड तसेच ०८७०१/०८७०२ दुर्ग गोंदिया दुर्ग या दोन स्पेशल ट्रेनही उपरोक्त कालावधीत सेवा देणार आहेत.
गाडी क्रमांक ६८७२१ रायपूर डोंगरगड मेमू, ६८७२३ डोंगरगड गोंदिया मेमू, ६८७२४ गोंदिया रायपूर, ६८७२९ रायपूर डोंगरगड आणि गाडी क्रमांक ६८७३० डोंगरगड रायपूर या सर्व मेमू ट्रेनचे संचालन नमूद कालावधीत केले जाणार आहे.
अतिरिक्त कोच जोडणार
जत्रेदरम्यान प्रवाशांना पुरेशी जागा मिळावी म्हणून १२८५५ बिलासपूर इतवारी इंटरसिटी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२२४० ईतवारी कोरबा शिवनाथ एक्सप्रेसला २८मार्च ते ६ एप्रिलपर्यंत गाडी क्रमांक १८२३९ कोरबा ईतवारी शिवनाथ एक्सप्रेसला २९ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत आणि गाडी क्रमांक १२८५६ इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसला ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत एक अतिरिक्त जनरल कोच जोडण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दपूम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक बुकिंग स्टाफ, चेकिंग स्टाफसह सफाई कर्मचाऱ्यांनाही आवश्यक निर्देश दिले आहेत.