लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ही मर्यादा संपूर्ण राज्यभर एकच म्हणजेच हेक्टरी ३० क्विंटल (एकरी १२ क्विंटल) करणे गरजेचे आहे.
राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरणीक्षेत्र चार लाख हेक्टरपेक्षा अधिक असून, बुलढाणा, बीडचे तीन लाखांच्या वर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळचे दोन लाखांच्या वर, अहिल्यानगर, जालना, वर्धा व नागपूर जिल्ह्यांचे एक लाखाच्या वर, तर उर्वरित १२ जिल्ह्यांमधील सोयाबीनचे पेरणीचे पेरणीक्षेत्र एक लाखापेक्षा कमी आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहेत.
खरेदीत उत्पादकतेचा अडसर
सोयाबीन विक्री नोंदणी, खरेदीला विलंब व उत्पादकतेनुसार खरेदी मर्यादा ही संपूर्ण प्रक्रिया विचारात घेता, सरकारला शेतकऱ्यांकडील सोयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी खरेदीत उत्पादकतेचा अडसर निर्माण केला जात असल्याने कृषी विभागाने आधी कमी आणि नंतर वाढीव उत्पादकता जाहीर केली, असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी व्यक्त केले आहे.
सोयाबीन खरेदी मर्यादा (क्विंटल/प्रतिएकर)
जिल्हा जुनी वाढीव१) नाशिक ६.०० ११.०६२) धुळे ६.६० ८.४४३) नंदुरबार ४.९९ ५.९६४) जळगाव ६.८० १०.८०५) अहिल्यानगर ५.८० १३.३०६) पुणे ९.४० १४.६०७) सोलापूर ६.०० ८.४४८) सातारा ८.८० १२.४५९) सांगली ९.३४ १५.३६१०) कोल्हापूर ९.८० १७.३१११) छ. संभाजीनगर ४.६८ ८.५३१२) जालना ६.०० ६.४३१३) बीड ७,०० १०.३०१४) लातूर ८.०४ ११.०११५) धाराशिव ६.८० ९.३०१६) नांदेड ५.४० ७.७११७) परभणी ५.३२ ८.०८१८) हिंगोली ५.६० ७.३५१९) बुलढाणा ६.०४ ७.६२२०) अकोला ५.८० ७.०६२१) वाशिम ८.१६ ९.१८२२) अमरावती ६.८४ ८.४२२३) यवतमाळ ५.७२ ६.५२२४) वर्धा ६.२० ८.५३२५) भंडारा ४.३० ५.८९२६) नागपूर ३.०० ५.६१२७) चंद्रपूर ६,०० ६.९१
Web Summary : Farmers demand a uniform soybean procurement limit across Maharashtra, setting it at 12 quintals per acre. Current limits vary widely by district, hindering fair access to MSP benefits. Farmer organizations criticize the government's procurement process.
Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन खरीद सीमा एक समान करने की मांग, 12 क्विंटल प्रति एकड़ तय करने का आग्रह। वर्तमान सीमा जिलेवार अलग-अलग है, जिससे एमएसपी लाभ में बाधा आ रही है। किसान संगठनों ने सरकार की खरीद प्रक्रिया की आलोचना की।