शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:06 IST

केंद्राची मंजुरी : पणन अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राज्यातील सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय सोमवारी घेण्यात आला असून, सोयाबीन खरेदीची मुदत रविवारी संपली होती. राज्यात नाफेड, एनसीसीएफ आणि पणनच्या सर्व अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी एमएसपी दराने सरकारला सोयाबीन विकण्यास प्राधान्य दिले होते. त्याअनुषंगाने राज्यात एकूण सात लाख ७७ हजार ७५७ शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफकडे नोंदणी केली होती. नाफेडच्या बहुतांश खरेदी केंद्रांवर डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून बारदान्याचा तुटवडा जाणवायला लागला आणि सोयाबीन खरेदी बंद पडली. त्यातच १२ जानेवारी रोजी या खरेदीची मुदतही संपली. 

परिणामी, लोकमतने रविवारी 'सोयाबीनचे करायचे काय?' व सोमवारी 'सोयाबीन खरेदी मुदतवाढ टांगणीला' या शीर्षकांखाली वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा लावून धरला होता.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबतच राजस्थान व तेलंगणामधील सोयाबीन खरेदीला ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रात सध्या ५ लाख ५५ हजार ७०५ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप व्हायचे आहे. राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफला १४.१३ लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. या दोन्ही संस्थांनी तीन महिन्यांत केवळ ४ लाख ५८ हजार ३१३ टन सोयाबीन खरेदी केल्याने उद्दिष्टपूर्तीसाठी किमान ९ लाख टन सोयाबीनची आवश्यकता असल्याने दोन्ही संस्थांनी सोयाबीन खरेदीला वेग देणे गरजेचे आहे.

टॅग्स :SoybeanसोयाबीनFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर