शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"२०२४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूरचा कसबा होईल"; आशिष देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By कमलेश वानखेडे | Updated: March 2, 2023 15:50 IST

दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे.

नागपूर : कसबा आणि नागपूर दक्षिण-पश्चिम या दोन्ही मतदारसंघांमध्ये साम्य आहे. येथील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत पंरंपरागत मतदारांनीही भाजपला धडा शिकवत काँग्रेसला विजयी केले. आता २०२४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपुरातही जनता भाजपला नाकारेल, असा दावा करीत काँग्रेसचे माजी आ. आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेम साधला आहे.

दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. २०१९ मध्ये आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून याच मतदारसंघात फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी देशमुख यांना पराभवाला सामोरा जावे लागले होते. आता कसबा निकालाचा आधार घेत देशमुख यांनी त्याच मतदारसंघावरून फडणवीस यांना लक्ष केल्याने राजकीय वतुर्ळाच्या भुवया उंचावल्या आहेत. देशमुख म्हणाले, २००९ व २०१४ ची निवडणूक फडणवीस हे आमदार म्हणून लढले. त्यावेळी त्यांना चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या विरोधात लढलो. 

मला प्रचारासाठी फक्त ११ दिवस मिळाले. त्यावेळी फडणवीस हे एक लाखावर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. पण ते ३५ हजारांनीच निवडून आले. त्यांचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश आले. दक्षिण-पश्चिम नागपूर हा भाजपचा गढ मानला जातो. कसबाही तसाच होता. या दोन्ही मतदारसंघात ब्राम्हण समाजाची सुमारे ३० ते ३५ टक्के मतदार आहेत. ते देखील भाजरपवर नाराज आहेत. आता कसब्याचा निकाल लागला. २०२४ मध्ये दक्षिण-पश्चिममध्येही काँग्रेस विजयी झालेली दिसेल, असा दावा देशमुख यांनी केला.

फडणवीसांविरोधात लढण्याची तयारी

२०१९ मधील पराभवानंतर आता २०२४ मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लढणार का, या प्रश्नावर देशमुख यांनी पक्षाने संधी दिली तर नक्कीच विचार करू, असे स्पष्ट केले. दक्षिण- पश्चिम नागपूरमध्ये आतुन खूप खदखद आहे. सामाजिक समीकरणे काँग्रेस सोबत आहेत. पक्षाने वेळीच सिग्लन दिला तर कामाला लागून चित्र पालटून दाखवू, असा दावाही देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpurनागपूर