पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

By संजय तिपाले | Updated: April 13, 2026 14:27 IST2026-04-13T14:25:53+5:302026-04-13T14:27:14+5:30

Gadchiroli : कौटुंबिक कलहातून मुलाने जन्मदात्या वडिलांना कुऱ्हाडीचे घाव घालून संपविले. ही खळबळजनक घटना आरमोरी तालुक्यातील पालाेरा येथे १२ एप्रिल रोजी रात्री घडली.

Son kills his father because he used to tell his wife work; Shocking incident in Gadchiroli | पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

Son kills his father because he used to tell his wife work; Shocking incident in Gadchiroli

‎लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
कौटुंबिक कलहातून मुलाने जन्मदात्या वडिलांना कुऱ्हाडीचे घाव घालून संपविले. ही खळबळजनक घटना आरमोरी तालुक्यातील पालाेरा येथे १२ एप्रिल रोजी रात्री घडली. घटनेवेळी पित्याचा फोनवरुन मुलीशी संवाद सुरु होता, पित्याच्या जोराच्या ओरडण्याने मुलीच्या काळजाचे पाणी- पाणी झाले. विशेष म्हणजे या घटनेनंतर निर्दयी मुलाने नातेवाईकांसोबत वडिलांचा शोध घेण्याचे नाटक केले, पण त्याचा हा बनाव फार वेळ टिकू शकला नाही.

‎पोलिसांच्या माहितीनुसार, देवाजी आडकू धकाते (६५,रा. ताडूरवारनगर , आरमोरी) असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलगा योगेश देवाजी धकाते (२५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.धकाते कुटुंबाची पालोरा गावाजवळ वीटभट्टी असून तेथे ते दोघे पिता- पुत्र दिवसभर काम करायचे. पाच मुलींनंतर योगेशचा जन्म झाला होता. मुलींचे विवाह झालेले असून योगेशचाही वर्षभरापूर्वी विवाह लावून दिला होता. योगेश लग्नानंतर आई- वडिलांसोबतच एकत्रित राहत होता. त्याची पत्नी गर्भवती होती, त्यातच वडील किरकोळ कारणावरुन रागावत असत, शिवाय गर्भवती असूनही तिला काम सांगायचे, ही बाब योगेशला खटकत होती. यातून पिता-पुत्रात खटके उडत. वडिलांना अद्दल घडविण्यासाठी त्याने त्यांच्या खुनाचा कट रचला. दोघे पिता- पुत्र अंधार पडल्यावर वीटभट्टीवरुन घरी येत. १२ एप्रिल रोजी त्याने वडिलांच्या आधीच घराचा रस्ता धरला. सायंकाळी साडेसात वाजता वडील घराकडे पायी परतत होते. 

‎मेलो रे... वडिलांचा काळीज हेलावणारा आवाज

‎पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक वडील पोहोचताच तेथे आधीच दबा धरुन बसलेल्या योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले. यावेळी वडील मुलगी निकिताशी फोनवरुन बोलत होते, हल्ल्यानंतर मेलो रे... म्हणत ते जोरात ओरडले. मुलीचे काळीज हेलावले. मात्र, तिच्यासाठी पित्यासोबतचा हा संवाद शेवटचा ठरला. तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.

‎पित्याला शोधण्याचे नाटक केले, पण...

‎दरम्यान, इकडे वडिलांना संपवून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह योगेशने घर गाठले. पाण्याने कुऱ्हाड धुतली. आई कमलबाई , चुलतभाऊ रुपेशसोबत वडिलांना शोधण्याचे नाटक केले. अखेर बोगद्याजवळ वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळी योगेशच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्या दिशेने वळली आणि अखेर चौकशीत त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.
‎ 

Web Title : पत्नी को काम कहने पर बेटे ने पिता को मारा: गडचिरोली घटना

Web Summary : गडचिरोली में, एक बेटे ने कथित तौर पर अपनी गर्भवती पत्नी को काम करने के लिए कहने पर अपने पिता की हत्या कर दी। उसने अपनी बेटी के साथ फोन पर बात करते समय अपने पिता पर कुल्हाड़ी से हमला किया। बेटे ने अपने पिता को खोजने का नाटक किया लेकिन बाद में गिरफ्तार कर लिया गया।

Web Title : Son Kills Father for Telling Wife to Work: Gadchiroli Incident

Web Summary : In Gadchiroli, a son murdered his father for allegedly making his pregnant wife work. He attacked his father with an axe while he was on a call with his daughter. The son pretended to search for his father but was later arrested.