शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:28 PM

घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’ अख्ख्या राज्यभर ‘हिट’ ठरू लागला आहे. यासाठी विशेषत: मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा उपक्रमसेंद्रिय खत निर्मितीडम्पिंग यार्ड परिसरात पीक उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कुठल्याही शहरातून जमा करण्यात आलेला सुका-ओला कचरा नष्ट करणे ही गोष्ट आता जुनी झाली. जमा झालेल्या कचऱ्यातून उत्पन्न कसे मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करून त्यात यशही आले. एवढेच काय तर डम्पिंग यार्ड परिसरात पिकाचे उत्पादन घेतले जात असून मत्स्यपालनही केले जाते, शिवाय निसर्गरम्य परिसर म्हणूनही तो भाग आता विकसित होऊ लागला आहे. या माध्यमातून प्रशासनाला लाखोंचा महसूलही मिळू लागला आहे. हे कथानक नसून वास्तवता आहे आणि त्याला मूर्तरुप सावनेर नगर परिषदेने दिले आहे. त्यामुळे आता घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’ अख्ख्या राज्यभर ‘हिट’ ठरू लागला आहे. यासाठी विशेषत: मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.नगर परिषद प्रशासनातर्फे शहरातील गल्लो-गल्लीमध्ये गाड्या फिरवून कचरा संकलित केला जात. त्यानंतर तो कंपोस्ट डेपोमध्ये जमा केला जातो. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरते. त्या परिसरातून ये-जा करणाऱ्यांची दमछाक होत असते. सोबतच डासांचेही प्रमाण वाढले हाते. त्यावर मात करण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येईल, यासाठी नगर परिषदेने विचारमंथन केले. त्यातून त्यांना सेंद्रिय खत निर्मिती केंद्र, पीक उत्पादन आणि मस्त्यपालनाचा मार्ग सापडला.नगर परिषदेने यासाठी ओला आणि सुका कचरा असे व्यवस्थापन केले. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम राबविला. हे सेंद्रिय खत चार रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. आतापर्यंत सावनेर पालिकेने तब्बल साडेसात टन खताची विक्री करीत महसूल मिळविला. सुका कचऱ्याचे २७ भागामध्ये विलगीकरण केले. यामध्ये काच, कपडा, प्लास्टिक, कागद, केस, थर्माकोल, टायर, रबर, इलेक्ट्रिक साहित्याचा कचरा, भंगार असे प्रकार केले. ते वेगवेगळे करून तो कचराही विक्रीसाठी ठेवला. त्यामुळे या माध्यमातून नगर परिषदेला अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले.प्लास्टिकचा उपयोग रस्ता निर्मितीसाठी केला. काही प्लास्टिक हे बुटीबोरी एमआयडीसीतील एका कंपनीला विकले. डम्पिंग यार्डमध्ये शेणखताद्वारे गांडूळ खत निर्मितीही केली जाते. सरासरी पाच क्विंटल खत तेथे तयार केले जाते.

मत्स्यपालनाने दोन समस्या मार्गीसावनेर नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डमध्ये मस्त्यपालनही केले जाते. यासाठी तलाव तयार केले असून वाघूर (कॅटफिश) माशाचे बीज सोडले. यात दोन हजार मस्त्यपालन केले जाते. हे बीज हावडा (कोलकाता) येथून आणले आहे, हे विशेष! या माध्यमातून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडली. शिवाय नगर परिषदेच्या हद्दीत मांसविक्री करणाऱ्या दुकानासमोर, परिसरात पडून राहिलेल्या मांसामुळे दुर्गंधी सुटते. ते मांस माशांसाठी खाद्य म्हणून वापरले जाते. यातून मांसाची विल्हेवाटही लागली आणि मास्यांसाठी खाद्य म्हणून होणाऱ्या खर्चावरही बचत झाली.

नर्सरी, भाजीपाल्याचे उत्पादनयाच डम्पिंग यार्ड परिसरात नगर परिषदेने शेती विकसित केली. तेथून मका, ऊस, केळी, भेंडी, कोहळे, लवकी, पालक, अंबाडी, तूर असे उत्पादन घेतले जाते. सोबतच नर्सरीही विकसित केली आहे. त्यामुळे या माध्यमातूनही नगर परिषदेला उत्पन्न मिळू लागले आहे. नगर परिषदेच्या आर्थिक भरभराटीस आता डम्पिंग यार्डची मदत मिळत आहे, हे विशेष! एवढेच काय तर डम्पिंग यार्ड परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. बगिचा तयार करण्यात आला. यामुळे सावनेर नगर परिषदेच्या सौंदर्यातही भर पडली असून नगर परिषदेचे नाव सर्वदूर होऊ लागले आहे. यामध्ये मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांचा महत्त्वपूर्ण हातभार आहे. त्यांना नगराध्यक्ष रेखा मोवाडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी यांच्यासह नगरसेवक आणि ग्रामस्थांनीही मदत केली.

टॅग्स :nagpurनागपूर