शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

सोलर रुफ टॉपला अनुदानाची ‘ऊर्जा’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:23 AM

भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देअद्याप दिशानिर्देश नाहीतकेंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. यासाठी जबाबदार असलेल्या महाऊर्जा किंवा महावितरण यापैकी कुणाकडेही ठोस उत्तर नाही. ते केंद्राकडे बोट दाखवित दिशानिर्देश नसल्याने आम्हीही दुविधेत असल्याचा दावा करीत आहेत.सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे अनुदान थांबलेले आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित होताच अनुदान दिले जाईल. परंतु हा दावाही फोल ठरत असल्याचे दिसून येते कारण आतापर्यंत यासंदर्भातील दिशा-निर्देशच ठरलेले नाहीत.विशेष म्हणजे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ‘ग्रीन एनर्जी’ ला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. घर किंवा प्रतिष्ठानांच्या छतावर सोलर रुफ टॉप योजना सुरु करण्यात आली. यापासून तयार होणारी अतिरिक्त विजेचे नेट मीटरिंगच्या माध्यमातून त्याची रक्कम बिलात समाविष्ट करून नागिरकांना दिलासा दिला जात आहे. ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली. निर्णय झाला की वर्ष २०१८-१९ मध्ये ५० मेगावॉट सौर ऊर्जाचे उत्पादन राज्यात केले जाईल. सोलर रुफ टॉप लावणाऱ्यांना प्रति किलोवॉट (के.डब्ल्यू) १४,३०० रुपयाचे अनुदान दिले जाईल. वर्ष २०१७-१८ मध्ये अनुदानाची रक्कम १६ हजार व त्यापूर्वी १७ हजार रुपये इतकी होती. महावितरणकडून नेट मीटरिंगचे प्रमाणपत्र देताच केंद्र सरकार महाऊर्जाच्या माध्यमातून अनुदान प्रदान करीत होते. मार्चपर्यंत सर्व व्यवस्थित चालले. यावेळीही अनुदान उशिराच आले. परंतु खरी समस्या यानंतर सुरु झाली. केंद्र सरकारने सांगितले की, नेट मीटरिंगची जबाबदारी महावितरणकडे आहे, त्यामुळे त्यांच्या मार्फतच अनुदान जारी केले जाईल. एप्रिलमध्ये यासंदर्भात ‘सर्क्युलर’ जारी करण्यात आले. परंतु आॅक्टोबर संपला तरी महावितरणला अनुदान मिळालेले नाही. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, त्यांना यासंदर्भात केंद्र सरकारच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशनकडून कुठलेही दिशा-निर्देश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत यासंदर्भात काहीही सांगता येणार नाही. महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आता अनुदान हा त्यांचा विषय राहिलेला नाही. ते केवळ मागच्या वर्षीच्या अनुदानाचा निपटारा करतील. महाऊर्जाने अनुदान जारी होण्यास विलंबासाठी कंत्राटदराला जबाबदार धरले आहे. ते वेळेवर अर्ज करीत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

अनेकदा केली विनंतीमहाऊर्जाचे म्हणणे आहे की, नागरिकांपर्यंत अनुदान पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेकदा केंद्र सरकारल पत्र लिहिले आहे. महावितरणने सुद्धा पत्र लिहिले. परंतु अजुनपर्यंत अनुदान जारी झालेले नाही.अनेकांनी नेट मीटरिंग सुरुच केले नाहीमहावितरणतर्फे टू वे मीटर लावल्यानंतरच अनुदान जारी होते. जर कुणी अनुदान मिळण्यापूर्वीच उत्पादन सुरु केले असेल तर त्याला ते मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांनी सोलर रुफ टॉप लावल्यानंतरही नेट मीटरिंग सुरु केलेले नाही. ही अडचण लक्षात घेता ठेकेदरांनी उपाय शोधला आहे. यासाठी असे इनव्हर्टर लावले जात आहे जे तितक्याच ऊर्जेचे उत्पादन करीत आहेत जितक्या ऊर्जेची गरज आहे. नेट मीटरिंगच्या अभावामुळे नागरिकांना अतिरिक्त उत्पादनाचा लाभही मिळत नाही आहे.

जास्तीत जास्त अनुदान १.३० लाख रुपयापर्यंतकेंद्र सरकारने ३ सप्टेंबर रोजी वर्ष २०१९-२० साठी अनुदानाचे जे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार जास्तीत जस्त १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जाईल. १ के डब्ल्यू क्षमतेसाठी जास्तीत जास्त २० हजार रुपये, दोन के डब्ल्यूसाठी ४० हजार रुपये, ३ के डब्ल्यूसाठी ६० हजार रुपये, ४ के डब्ल्यूसाठी ७० हजार रुपये, ५ के डब्ल्यूसाठी ८० हजार रुपये, ६ के. डब्ल्यूसाठी ९० हजार रुपये, ७ के.डब्ल्यूसाठी १ लाख रुपये, ८ के. डब्ल्यूसाठी १.१० हजार रुपये, ९ के. डब्यूसाठी १.२० हजार आणि १० के.डबल्यू आणि त्यापेक्षा अधिकसाठी १ लाख ३० हजार रुपयाच अनुदान दिले जाईल.

टॅग्स :Governmentसरकार