शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या क्लिकवर स्वच्छ होतील सोलर पॅनेल; कशी काम करते सौर पॅनेल क्लिनिंग सिस्टीम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:54 IST

Nagpur : प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण स्वच्छतेसाठी सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर ही भविष्याची गरज आहे. त्यामुळे सरकारही सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असून, लोकांचा प्रतिसादही वाढत आहे.

निशांत वानखेडेनागपूर : प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण स्वच्छतेसाठी सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर ही भविष्याची गरज आहे. त्यामुळे सरकारही सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असून, लोकांचा प्रतिसादही वाढत आहे. मात्र, सौर पॅनेलची स्वच्छता हा वापरकर्त्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. यावर नागपूरच्या संशोधकांनी देशी, पण स्मार्ट तोडगा शोधून काढला आहे. छतावर किंवा कुठेही लागलेले सौर पॅनल मोबाइलच्या एका क्लिकवर स्वच्छ होतील, अशी ऑटोमॅटिक अॅप सिस्टीम या संशोधकांनी विकसित केली आहे.

नवीकरणीय ऊर्जेतील नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारे एक महत्त्वपूर्ण संशोधन नागपूरचे डॉ. राहुल पेठे, रोहित शहारे, वृषभ गिल्लारकर आणि हर्ष सूर्यवंशी यांनी विकसित केले आहे. प्रगत ८ किलोवॅट सोलर पॅनल क्लिनिंग सिस्टिमने प्रत्यक्ष कार्यरत परिस्थितीत यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या असून, ती आता व्यावसायिक विक्रीसाठी सज्ज आहे. सखोल फील्ड ट्रायल्सदरम्यान या प्रणालीने विश्वासार्ह कार्यप्रदर्शन, प्रभावी डिटर्जंट आधारित स्वच्छता आणि सातत्यपूर्ण कार्यक्षमता सिद्ध केली. सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक निकष ठरवलेल्या मानकांनुसार पूर्ण केले. ही प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरासाठी पूर्णतः सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. या यशामुळे प्रेरित होऊन विकासकांनी या तंत्रज्ञानाच्या उत्पादन व विपणनासाठी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे.

स्वच्छता का महत्त्वाची?

सौर पॅनेलवर दर दिवशी साचणारी धूळ, मळ ही सौर प्रकल्पासाठी गंभीर समस्या आहे. धुळीचा थर साचला की सौर पॅनेलच्या ऊर्जा निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो व वीज निर्मितीत मोठी घट होऊ शकते. धुळीच्या आणि उच्च तापमानाच्या वातावरणासाठी खास डिझाइन करण्यात आलेली ही प्रणाली अत्यल्प सहायक ऊर्जा वापरून सुरक्षित, नियमित आणि कार्यक्षम स्वच्छता सुनिश्चित करते, अशी माहिती डॉ. राहुल पेठे यांनी दिली.

कशी काम करते सौर पॅनेल क्लिनिंग सिस्टीम ?

या सिस्टीममध्ये सौर पॅनेलवर पाईप व स्प्रिंकलर लावण्यात येते. हे पाइप ५ व्हॉल्टच्या मोटरशी जोडले जाते. हे सर्व उपकरण मोबाइल व 'वायफाय'शी कनेक्ट केले जाते. संशोधकांनी यासाठी एक अॅप तयार केले आहे. या अॅपवर तीन बटन असतात. एक अर्धा मिनिट पाणी सोडणारी, नंतर दुसरी अर्धा मिनिट डिटर्जंट फोम सोडणारी व तिसरी पुन्हा पाणी सोडून वायपरच्या मदतीने सौर पॅनेल स्वच्छ करते. दर १५ दिवसांनी तुम्ही कुठूनही स्वतःच्या मोबाइलने घरावरचे सौर पॅनेल स्वच्छ करू शकता. या ऑटोमॅटिक सिस्टीममुळे पॅनलच्या पृष्ठभागास कोणतीही हानी होत नाही आणि स्वच्छतेनंतर ऊर्जा उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

"ही सिस्टीम आमच्या घरी कार्यरत आहे आणि जवळपासच्या सौर पॅनेल असलेल्यांकडे त्याची यशस्वी चाचणी केली आहे. ते पूर्ण क्षमतेने कार्य करीत आहे. यात मॅन्युअल श्रम लागत नाही, देखभाल खर्च घटतो व सोलर प्रकल्पांची एकूण कार्यक्षमता वाढवण्यात यश मिळाले आहे. आम्ही ही प्रणाली बाजारात सादर करण्यासाठी आणि वाढत्या सौरऊर्जा क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी पूर्णतः तयार आहोत."- डॉ. राहुल पेठे, संशोधक

English
हिंदी सारांश
Web Title : Clean Solar Panels with a Mobile Click: Smart Cleaning System

Web Summary : Nagpur researchers developed an automatic app to clean solar panels. The system uses sprinklers, detergent, and a wiper, all controlled via a mobile app. It enhances energy production, reduces manual labor, and is ready for market.
टॅग्स :nagpurनागपूर