शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

- तर कसे बांधायचे घरकूल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी : शासनाने गरीब लोकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याकरिता घरकूल योजना सुरू केली. कोंढाळी येथे शासनाने ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी : शासनाने गरीब लोकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याकरिता घरकूल योजना सुरू केली. कोंढाळी येथे शासनाने ४९७ घरकुले मंजूर केली. पण या घरकुलांच्या यादीत अनेक घोळ असल्याने घरे बांधावी तरी कशी असा प्रश्न कोंढाळी ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. घरकूल योजनेंतर्गत घर बांधण्याकरिता १ लाख २० हजार रुपये रक्कम व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत श्रमदानाचे १८ हजार असे एकूण १ लाख ३८ हजार रुपये प्रती लाभार्थ्यांना मिळतात.

शासनाने कोंढाळी येथे २०२०-२१ करिता ४९७ घरकूल मंजूर केले. पण यातील १४० लाभार्थ्यांची घरे वनविभाग व खासगी जमिनीवर अतिक्रमण करुन बांधली आहेत. ६६ लाभार्थ्यांचा जागेबाबत वाद सुरू आहे. १८ लाभार्थ्यांकडे पूर्वीच सिमेंट काँक्रीटची पक्की घरे आहेत. १५ लाभार्थ्यांच्या घरकुलाकरिता नावे तर आली. पण लाभार्थी कोंढाळी गावातच राहत नाही. ७ लाभार्थ्यांची नावे अशी आहेत की पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. ४ निराधार वृद्धांना घरकुलांची गरज आहे. त्यांची नावेही यादीत आहेत पण कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास व ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी या लाभार्थ्यांकडे वारंवार चकरा मारूनही ते घर बांधण्यास तयार नाहीत. याबाबत कोंढाळी ग्रामपंचायतकडून प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांना कळविण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष घरकूल बांधण्याची गरज असलेल्या निराधार ४ लोकांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना घर बांधण्याची विनंती केली. तरी हे लाभार्थी घर बांधण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली.

महसूल विभागाने पट्टे वाटप करावे

वनजमिनी व खासगी जमिनीवर अतिक्रमण असल्याने घर बांधकामाकरिता निधी देता येत नाही असे कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उपसरपंच स्वप्नील व्यास यांनी स्पष्ट केले आहे. महसूल विभागाने लोकांना पट्टे वाटण्याकरिता १५७ प्लॉट राखून ठेवले होते. पण गेल्या २५ वर्षांत लोकांना प्लॉटचे वितरणच केले नाही. यानंतर जवळपास १२५ प्लॉटवर लोकांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत. येथे ३० प्लॉट शिल्लक आहेत. ही जमीन महसूल विभागाने कोंढाळी ग्रामपंचायतीला दिली तर गरजू लोकांना घरकूल बांधकाम करण्यासाठी येथे प्लॉट उपलब्ध करून देता येतील, असे ग्रा.पं.चे म्हणणे आहे.