नागपुरात मरकजहून आलेले आतापर्यंत ९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 09:30 PM2020-04-13T21:30:43+5:302020-04-13T21:32:05+5:30

दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहून आलेल्या १९७ संशयितांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यातील ६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३१ नमुन्यांची तपासणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, यातील मरकजहून आलेले ९ संशयित कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

So far 9 positives come from Merkaj in Nagpur | नागपुरात मरकजहून आलेले आतापर्यंत ९ पॉझिटिव्ह

नागपुरात मरकजहून आलेले आतापर्यंत ९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देदिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले १९७ संशयित : आतापर्यंत केवळ ६६ नमुन्यांची तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहून आलेल्या १९७ संशयितांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यातील ६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३१ नमुन्यांची तपासणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, यातील मरकजहून आलेले ९ संशयित कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
नागपुरात ३० मार्चपर्यंत बाधित आलेल्यांची साखळी खंडित झाली होती. परंतु पाच दिवसानंतर पहिल्या कोरोनाबाधित मृताची नोंद होताच रुग्णांची संख्या वाढू लागली. यात भर पडली ती दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहूुन नागपुरात आलेल्यांची. यातील सुमारे १९७ संशयितांना आमदार निवास, रवी भवन, वनामती व लोणारा येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यांची तातडीने नमुने तपासणी होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत ६६ नमुन्यांची तपासणी झाली असून १३१ नमुन्यांची तपासणी शिल्लक आहे. मरकजहून आलेल्यांमध्ये रविवारी जबलपूरमधील चार, मोमीनपुऱ्यातील एक तर सतरंजीपुऱ्यातील एक तर सोमवारी जबलपुरचेच आणखी तीन असे ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे इतरांची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य संशयित संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. यातील काहींचे एकमेकांच्या खोलीत ये-जा असल्याने व वऱ्हांड्यात ते फिरत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: So far 9 positives come from Merkaj in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.