शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत १८.६४ लाख क्विंटल कापसाची खरेदी : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:49 IST

कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडे असलेल्या संपूर्ण कापसाची खरेदी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून जिल्ह्यात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कापूस खरेदी करण्यासाठी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे सुरू राहणार आहेत. कापूस खरेदी योजनेंतर्गत दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सी. सी. आय. मार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे. कापूस पणन महासंघातर्फे नोंदणी केलेल्या १६, ८६० शेतकऱ्यांकडून ४ लाख ८ हजार ४५५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सी. सी. आय. मार्फत ३.७०५ शेतकऱ्यांकडून १ लाख २४ हजार ९०४ क्विंटल तसेच खासगी बाजाराच्या माध्यमातून ५,२९३ शेतकऱ्यांकडून ८१,८९६ क्विंटल, थेट परवानाधारक २,०२० शेतकऱ्यांपासून ४२,७४० क्विंटल तसेच खासगी समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी ६१,३९९ शेतकऱ्यांकडून १२ लाख ६ हजार १९१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.३०,२८६ शेतकऱ्यांचा १८,२६१ क्विंटल कापूस खरेदी शिल्लकनोंदणी केलेल्या ३०,२८६ शेतकऱ्यांकडील १८,२६१ क्विंटल कापूस अद्याप खरेदी शिल्लक आहे. कोविड-१९च्या आधी ५७,७०५ शेतकऱ्यांकडून १२ लाख १८ हजार ३४६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. कोविड-१९ नंतर ३२ हजार २१९ शेतकऱ्यांसाठी ६ लाख ४५ हजार ८४३ क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर