दुचाकीवरून एमडीची तस्करी, आरोपीला अटक
By योगेश पांडे | Updated: July 14, 2024 17:57 IST2024-07-14T17:56:47+5:302024-07-14T17:57:20+5:30
आरोपीविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

दुचाकीवरून एमडीची तस्करी, आरोपीला अटक
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरून एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
वैभव उर्फ विभव विपीन गुप्ता (२७, जयताळा) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असाना माटे चौकात पोलिसांनी एमएच ३१ व्ही ५१९७ ही दुचाकी थांबविली. पोलिसांनी दुचाकीस्वार वैभवची झडती घेतली असता त्याच्याजवळ लाल रंगाच्या पिशवीत ३.७१ ग्रॅम एमडी पावडर आढळली. तिची किंमत ३७,१०० इतकी होती. त्याच्या दुचाकीत पोलिसांना मोबाईल, ईलेक्ट्रीक वजन काटादेखील आढळून आले. त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.