शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पावसाची संथ चाल, गेल्यावर्षीच्या तुलनेत जलाशयांतही २० टक्के कमी जलसाठा

By कमलेश वानखेडे | Updated: July 18, 2023 14:53 IST

तोतलाडोह ७० टक्के तर कामठी खैरी जलाशय ६९ टक्केच साठा

नागपूर : मान्सूनचे आगमन उशीरा झाले. त्यानंतरही पावसाची चाल संथ राहिला. याचा परिणाम पूर्व विदर्भातील जलाशयांच्या जलसाठ्यावर झाला आहे. पूर्व विदर्भातील मोठ्या जलाशयांमध्ये ३३ टक्केच जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या आजच्या दिवसाची तुलना केली असता जलसाठा २० टक्क्यांनी कमीच आहे. पुढील दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर या जलाशयांचे पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरणे कठीण जाणार आहे.

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात ७०८ दलघमी म्हणजे सुमारे ७० टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला जलसाठा ८० टक्क्यांवर होता. कामठी खैरी जलाशयातही ७० टक्के साठा आहे.रामटेक खिंडसीमध्ये ६६ टक्के तर नांद व वणा मध्ये सुमारे ४० टक्केच जलसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इडियाडोह ५८ टक्के तर पुजारी टोला फक्त ३३ टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ईरई धरणही ३२ टक्केच भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व लोवर वर्धा -१ हे दोन्ही प्रकल्प अजूनही ५० टक्क्यांखालीच आहेत.

दिना, असोलामेंढा फुल्ल

- गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प (६७.५७ दलघमी) व चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा (५२.३३ दलघमी) हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

गोसीखुर्द प्रकल्प ३६ टक्केच भरला

 भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पही फक्त ३६ टक्केच भरला आहे. या प्रकल्पात सध्यस्थितीत २६२.४६१ दलघमी साठा आहे. बावनथडी प्रकल्पाही ३१ टक्केच भरला आहे.

धरणक्षेत्रात निम्माच पाऊस

- तोतलाडोह, कामठी खैरी व रामटेक खिंडसी या जलाशयांच्या क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी १८ जुलैपर्यंत तोतलाडोह धरणक्षेत्रात ६९५ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी फक्त ३५१ मिमी पाऊस झाला आहे. कामठी खैरी जलाशयाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ६८५ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी आजवर फक्त २८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जलाशय -आजचा साठा -मागील वर्षी (१८ जुलै)तोतलाडोह - ७० टक्के - ८० टक्केकामठी खैरी - ६९ टक्के - ९४ टक्केरामटेक खिंडसी - ६६ टक्के - ७३ टक्केलोवर नांद- ४० टक्के - ६७ टक्केलोवर वणा- ३८ टक्के - ७० टक्केइडियाडोह - ५८ टक्के - ४३ टक्केसिरपूर - ४४ टक्के - ५५ टक्केपुजारी टोला - ७३ टक्के - ७५ टक्केकालिसरार - ६२ टक्के - ६३ टक्केईरई - ३२ टक्के - ८४ टक्केबोर - ३९ टक्के - ६७ टक्केलोअर वर्धा- १ - ५२ टक्के- ६६ टक्केगोसीखुर्द - ३५ टक्के - २७ टक्केबावनथडी - ३१ टक्के - ७५ टक्के

टॅग्स :Waterपाणीmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसDamधरणnagpurनागपूर