शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कुख्यात आंबेकरसह दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: March 4, 2016 02:48 IST

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला सहकारनगर गजाननधाम येथील अभियंते स्वप्नील बिडवई यांच्या घरावर फसवेगिरीतून ...

सहकारनगरातील अभियंत्याच्या घरावरील अवैध कब्जा प्रकरणनागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला सहकारनगर गजाननधाम येथील अभियंते स्वप्नील बिडवई यांच्या घरावर फसवेगिरीतून अवैध कब्जा केल्याप्रकरणी मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर याच्यासह दोन जणांना ९ मार्चपर्यंत (सहा दिवस) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. संतोष शशीकांत आंबेकर (४०) रा. संती रोड इतवारी आणि प्रकाश चिंतामण मानकर (३०) रा. नवी वस्ती फुटाळा, असे हे आरोपी आहेत. त्यापैकी आंबेकर हा टोळीचा म्होरक्या आहे. यापूर्वी याच प्रकरणात डेव्हलपर्स सचिन जयंत आढूळकर (३७) रा. महाल, विजय मारोतराव बोरकर (५२) रा. टेलिफोननगर दिघोरी, लोकेश दिलीप कुभीटकर (२८) रा. विद्यानगर कोराडी, युवराज ठुनिया माथनकर (३३) रा. बेलतरोडी शिव हाईटस्, आकाश किशोर बोरकर (३१) रा. कामगार कॉलनी सुभाषनगर, शक्ती राजू ऊर्फ संजू मनपिया (३०) रा. बारासिग्नल, विनोद भीमा मसराम (३५) रा. सीताबर्डी आणि संजय ऊर्फ संजू रामोजी फातोडे (४२) रा. पांढराबोडी, अशा आठ जणांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आलेली होती. ते न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये असून कारागृहात आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध २३ जानेवारी रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या ४४८, ४५२, १४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ -ब आणि महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्याच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे होते प्रकरणसहकारनगर गजाननधाम येथे स्वप्नील बिडवई यांचे १७५३ चौरस फुटाच्या भूखंडावर दोन मजली घर आहे. ही मालमत्ता त्यांच्या आईच्या नावे आहे. हे घर पाडून त्यावर चार मजली इमारत बांधून देण्याचा डेव्हलपर्स सचिन आढूळकर आणि विजय बोरकर यांचा प्रस्ताव होता. १२०० चौरस फुटाचे क्षेत्र असलेला पहिला मजला बिडवई यांच्या मालकीचा राहील. याशिवाय १८ लाख ७५ हजार रुपये मोबदला म्हणून दिला जाईल, इमारतीच्या टेरेसची मालकी कायमस्वरूपी बिडवई यांचीच राहील, असाही प्रस्ताव होता. ३० डिसेंबर २०१५ रोजी महालच्या दुय्यम निबंधक कार्यालयात करार करून तो नोंदणीकृत करण्यात आला होता. (प्रतिनिधी)