शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गाणारांना संघातूनच फटाके

By admin | Updated: June 17, 2016 03:01 IST

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांना या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

संजय बोंदरे रिंगणात उतरणार : नाराज गटाचा पाठिंबा नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांना या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. शिक्षक परिषद आणि संघ या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते असलेले संजय बोंदरे यांनी गाणारांना आव्हान देत निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे बोंदरे यांना संघाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वेळी शिक्षक परिषदेसह संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘नागो गाणार, अमदार होणार’ असा नारा दिला होता. कार्यकर्ते जोमाने कामला लागले होते. गाणारांची स्वच्छ प्रतिमाही कामी आली. गाणार विजयी झाले. मात्र, मागील साडेपाच वर्षात गाणारांकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने शिक्षक परिषदेचे बरेच कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या गोटातूनच गाणार यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध सुरू झाला. यातूनच गेल्यावेळचा नारा बदलला गेला. ‘नागो गाणार, तिकीट कटणार’ असे विरोधक ठासून सांगू लागले. मात्र, गाणारांनाच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे विरोधक आणखी दुखावले असून त्यांनी आता उघड बंड पुकारले आहे. गाणार यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत मराशिपचे कार्यकर्ते असलेले संजय बोंदरे यांना उमेदवारीसाठी पाठबळ दिले आहे. बोंदरे यांनीही आपण गाणार यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. बोंदरे हे भांडेवाडी येथील जय विजय उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संघ परिवाराशी संबंधित संस्थांमध्ये ते पदाधिकारीही आहेत. बोंदरे यांच्या या भूमिकेमुळे संघ परिवार गाणारांना साथ देईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)