सकल मराठा समाजातर्फे मूक निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 00:00 IST2021-06-09T23:58:58+5:302021-06-10T00:00:32+5:30
Maratha community Silent demonstrations

सकल मराठा समाजातर्फे मूक निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महालातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षणाबद्दल मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी शिरीष शिर्के, मनोज साबळे, नरेंद्र मोहिते, जयसिंग भोसले, प्रशांत भोसले, विलास वाघ, महेंद्र शिंदे, मिलिंद साबळे, प्रकाश जाधव, संजय सावंत, जितेंद्र खोत, उमेश घाडगे, प्रशांत निकम, दीपक देशमुख, दत्ता शिर्के, जनार्दन जगताप, संजय घागरे, गजानन कावळे, राजेंद्र चव्हाण, अखिल पवार, विक्रम वाघ, शरद बाहेकर, विजय भोसले, रमेश पवार, शंकर दयाळ, महेश पवार, हेमंत भोसले, प्रकाश खंडागळे, दीपक जाधव, किरण भोसले, गणेश गरुड, अक्षय मुंगळे, दीपक कदम, संदीप कदम, दीपक इंगळे, ममता भोसले, श्वेता निकम, भाग्यश्री शिर्के आदी उपस्थित होते.