शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

श्याम धर्माधिकारी : नागपूरला प्राधान्य देणारा रंग-चित्रभूमीवरील हरहुन्नरी दिग्दर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:06 AM

रंगभूमी आणि चित्रपटनगरी यात पुणे-मुंबई आणि मराठवाड्याचा वर्चस्व राहीला आहे. अशात नागपूर आणि विदर्भाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी झटणारा रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून श्याम धर्माधिकारी यांचे नाव नागपुरच्या इतिहासात कोरला जाणार आहे. रविवारी हृदयाघाताने त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देव्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा ‘नाट्यपरिजात’चा वारसा कोण पुढे नेणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगभूमी आणि चित्रपटनगरी यात पुणे-मुंबई आणि मराठवाड्याचा वर्चस्व राहीला आहे. अशात नागपूर आणि विदर्भाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी झटणारा रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून श्याम धर्माधिकारी यांचे नाव नागपुरच्या इतिहासात कोरला जाणार आहे. रविवारी हृदयाघाताने त्यांचे निधन झाले. अचानक आलेल्या निधन वार्तेने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात नवे काही करू बघण्याचा प्रचंड आघात बसला आहे, तो धर्माधिकारी यांच्या कर्तृत्त्वामुळेच.

उद्योग आणि कलाक्षेत्राचा विकास जसा मुंबई-पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात झाला. त्या तुलनेत विपुल बुद्धीमत्ता असतानाही विदर्भात झालेला नाही. राज्य सरकारचा विदर्भाकडे बघण्याचा तुसडेपणाचा भावच त्याला कारणीभूत ठरला. मात्र, माझे घर-माझे गाव-माझे क्षेत्र तर जबाबदारीही माझीच... या सुत्राने श्याम धर्माधिकारी यांनी आपले कर्तृत्त्व गाजवले. त्यातूनच त्यांनी हौशी रंगभूमी म्हणून परिचयाची असणाऱ्या वैदर्भीय रंगभूमीला व्यावसायिकतेची जोड देण्याचे भरपूर प्रयत्न केले. त्यातून, हाऊसफुल्ल ठरलेले ‘सापळा’ हे नाटक २००१ साली व्यावसायिक रंगभूमीवर वैदर्भीय नटांच्याच संगतीने आणले. विशेष म्हणजे, ज्या काळात हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले, तो काळ नागपूर आणि वैदर्भीय रंगभूमीच्या अधोगतीचा असल्याचे मानले जाते. अशा काळात निपचित पडत चाललेल्या रंगभूमीला उभारी देण्याचे काम झाले. यापूर्वी तर नागपुरात नाट्यचवळ मार खायला लागली होती. अशात नव्या कल्पनांना साकार करत त्यांनी १९८५मध्ये ‘नाट्यपरिजात’ ही नाट्यसंस्था स्थापन केली आणि यातून लहान मुलांचे नाट्य, संगीत आणि अभिनयाद्वारे व्य्क्तिमत्त्व विकास साधण्यात मोलाची भूमिका निभावली. नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, लेखन आणि अभिनयात समोर असणाऱ्या धर्माधिकारी यांनी या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदितांना पुढे आणले. संस्थेच्या माध्यमातून राज्यनाट्य, कामगार स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नवोदितांना व्यासपीठ दिले. सोबतच नाट्यकार्याशाळा घेऊन अनेक कलावंत घडविले. 
मुळात मेकॅनिकल अभियंते असलेल्या धर्माधिकारी यांना रंगभूमी आणि चित्रपटांचे प्रचंड वेड. त्यातूनच, त्यांनी स्वत:ची नोकरी व व्यवसाय सांभाळत या क्षेत्रात भरारीने काम केले. चित्रपटासाठी लागणाºया संपूर्ण यंत्रणेला नागपुरात आणून, नागपुरातच चित्रपट निर्मिती करण्याचे पहिले श्रेय त्यांनाच जाते. त्यासाठी सिनेमॅटोग्राफी, फिल्म अ‍ॅण्ड टी.व्ही. टेक्नॉलाजी, चित्रपटाचे संपादन आणि दिग्दर्शनाचे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. शिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असल्याने अनेक महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचेही कार्य केले. अतिथी व्याख्यानासाठीही त्यांना वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात निमंत्रित करण्यात येत होते. राज्य शासनासाठी आणि स्वतंत्रपणेही त्यांनी १४० पेक्षा जास्त लघुपटाची निर्मिती केली. त्यात गरीबी, शेतकरी समस्या, सामाजिक आशयावरील विषय हाताळले. सोबतच ‘नाम फाऊंडेशन’साठीचा लघुपटही त्यांनी तयार केला आहे. यासोबतच, त्यांनी १३ मराठी आणि तीन हिंदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नुकताच ‘मैं कोन हुँ’ हा चित्रपट पूर्ण केला. त्यातही संपूर्ण यंत्रणा नागपूरचीच होती. नागपूरकरांना चित्रपटाचे प्रत्यक्ष धडे देण्यासाठी त्यांनी ‘माहेरची साडी’ या गाजलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यासाठी त्या चमूला नागुरात आणले होते. सिनेमा म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो हे नागपूरच्या कलावंतांना सांगण्याचे श्रेय श्याम धर्माधिकारी यांना जाते. नागपूरकर कलावंतांना चित्रपटात स्थान मिळावे म्हणून ते सातत्याने धडपडत होते. केवळ हौस म्हणून नाटक करण्यापेक्षा व्यावसायिक नाटक उभारून कलावंतांना लाभ व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या धडपडीचा तो वारसा आता कोण स्विकारणा, असा हृदयी प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे.त्यांच्या कामात सातत्य होते. रंगभूमीकडे व्यावसायिक दृष्टीकोण बघणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये ते गणले जात. त्याच दृष्टीकोणातून ‘सापळा’ या नाटकाने प्रसिद्धी मिळविली होती.नरेश गडेकर, उपाध्यक्ष - अ.भा. मराठी नाट्यपरिषदमाझ्यातील अभिनेत्याची जाणिव त्यांनाच झाली आणि ते माझे गुरू ठरले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नाट्यपरिजात’चा १९८८ पासून सदस्य आहे. ‘सापळा’मध्ये मी काम केले. त्यांच्यामुळेच माझे भाग्य बदलले.राजेश चिटणीस, प्रसिद्ध अभिनेता

टॅग्स :NatakनाटकTheatreनाटकnagpurनागपूर