लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : प्रेयसीची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:31 IST2019-06-07T21:30:58+5:302019-06-07T21:31:49+5:30

लग्नाच्या आणाभाका घेत दोन वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी प्रतीक भारतभूषण मल्होत्रा (वय २८) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Showing lure of Marriage rape by lover: Fiancee's police complaint | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : प्रेयसीची पोलिसात तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : प्रेयसीची पोलिसात तक्रार

ठळक मुद्देप्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाच्या आणाभाका घेत दोन वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी प्रतीक भारतभूषण मल्होत्रा (वय २८) नामक तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पावनभूमी परिसरात राहणारा प्रतीक इंटेरिअर डिझाईनिंग करतो. टेक्स्टाईल इंजिनिअर असलेल्या २७ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षांपूर्वी प्रतीकची फेसबुकवरून ओळख झाली. फेसबुक फ्रेन्ड बनलेल्या या दोघांनी नंतर एकमेकांना आपले मोबाईल नंबर एक्स्चेंज केले. त्यानंतर ते तासन्तास संपर्कात राहायचे. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०१७ ला रात्री त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ते नेहमीच शरीरसंबंध जोडू लागले. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, प्रतीकने त्यांच्या शरीरसंबंधाचे तसेच प्रेयसीचे अश्लील फोटो काढून ठेवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडत होता. २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यात हे सुरू होते. तिने लग्नाचा विषय काढताच तो प्रारंभी तिला टाळत होता. काही दिवसांपूर्वी तिने लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. तो दुसरीकडे सूत जुळवून लग्न करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने प्रेयसीने प्रतीकविरुद्ध सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Showing lure of Marriage rape by lover: Fiancee's police complaint